Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण – निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी*...

*बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी तयारी पूर्ण – निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी* *

बारामती, दि. ४: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता मंगळवार ७ मे रोजी मतदान होत असून मतदानाच्यादृष्टीने मतदार संघातील सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत.

बारामती विधानसभा मतदारंसघात ३८० मतदान केंद्र, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोर एकूण ५६१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्र आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.

दौंड विधानसभा मतदासंघात २ हजार ५९७, इंदापूर २ हजार ५१८, बारामती ३ लाख ५००, पुरंदर ३ हजार ३७७, भोर ४ हजार ६२ व खडकवासला मतदार संघासाठी ४ हजार ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे ६ मे रोजी वितरण करण्यात येणार असून दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी दिली आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments