Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करणेचे काम सुरू

पिंपरी येथे मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करणेचे काम सुरू

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे त्याअनुशंगाने पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयाकडुन मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व VVPAT) मतदानासाठी तयार करणेची प्रक्रिया दि. ०५/०५/२०२४ ते ०७/०५/२०२४ या कालावधीत करणेत येत आहे. मतदान यंत्रे तयार करणे व इतर अनुषंगीक कामे करणेसाठी सेक्टर ऑफीसर, त्यांचे सहायक, अशा एकुण ३५ टेबल करिता १३५ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करणेत आली आहे. EVM व VVPAT मशीन्स केंद्रनिहाय सिलिंग करणेकरिता देणे व तयार झालेल्या मशीन्स केंद्रनिहाय लावून घेणे, खराब झालेली मतदान यंत्रांची नोंद घेणे व ती बदलुन देणे, EMS वरील Data entry पूर्ण करणे तसेच EVM संबधीत सर्व रिपोर्टींग तयार करणेसाठी १० अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमणेत आले आहे. मतदानास EVM व VVPAT मशीन तयार करणेकरीता सिलिंग साहित्याचे टेबलनिहाय ट्रे बनविणे साहित्यांची नोंद विहित नमुन्यात घेणेसाठी भांडारपाल यांच्यासह १० अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक करणेत आलेली आहे. मतदान यंत्र तयार करणेबाबत सर्व उमेदार व राजकीय पक्षांना कळविण्यात आले असल्याचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच जयराज देशमुख यांची समन्वय अधिकारी, मनोज सेठीया नोडल अधिकारी, अभिजीत केंद्रकर सहा. समन्वय अधिकारी, विजय भोजने संगणक व राजकीय पक्ष पत्रव्यवहार समन्वयक, तुषार पडवळ भांडारविभाग समन्वयक म्हणुन नेमणुका करणेत आलेल्या आहेत.

 

 

 

2

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments