Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीव्हीआर आयनॉक्स’ तर्फे पुण्यात कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये पहिला सुपर-प्रीमियम डायरेक्टर्स कट...

पीव्हीआर आयनॉक्स’ तर्फे पुण्यात कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये पहिला सुपर-प्रीमियम डायरेक्टर्स कट सिनेमा आणि आयसीई थिएटर्स सुरू

सेव्हन-स्क्रीन मल्टीप्लेक्ससह पश्चिम भारतात विस्तार~

 

 

राष्ट्रीय, ८ मे, २०२४: भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वाधिक प्रीमियम चित्रपट प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स ने कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये आपल्या सेव्हन-स्क्रीन मल्टीप्लेक्सच्या उद्घाटनाची आज घोषणा केली. येथे देशातील आघाडीचे ‘डायरेक्टर्स कट’ आणि ‘आयसीई (इमर्सिव्ह सिनेमा एक्स्पिरियन्स) थिएटर्स’ हे आलिशान चित्रपट फॉर्मेट्स प्रदर्शित केले जात असून दोन्ही प्रकारांचे पश्चिम विभागातील हे पहिले पदार्पण आहे.

 

या चित्रपटगृहाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्यासमवेत ‘पीव्हीआर आयनॉक्स’च्या देशभर नावाजलेल्या ‘द लक्झरी कलेक्शन’ संग्रहांतर्गत चित्रपट पाहण्याचा सुखद व रममाण करणारा अनुभव देणारी ५ डायरेक्टर्स कट प्रेक्षागृहे आणली आहेत. या चित्रपटगृहात ‘आयसीई थिएटर्स’ व खास प्रेक्षागृहही आहे जेथे आधुनिक वैभव व पुनर्परिभाषित करणारी आऱामदायकता यांचा संगम ४के लेझर प्रोजेक्शन, डॉल्बी ॲटमॉस साऊंड व नेक्स्ट जनरेशन थ्रीडी अशा प्रगत तंत्रज्ञानाशी होतो. लगत असलेला गॅट्सबी रेस्टो-बार आपल्या अजोड खास खानपानासह चित्रपट भव्यतेने बघण्याचा असाधारण अनुभव मिळवून देतो. चित्रपटगृहाभोवती जागतिक दर्जाच्या खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत, जसे ‘पॉपकॉर्न बार’मध्ये विविध चवींची पॉपकॉर्न, ‘ल क्युझिन’मध्ये समकालीन कॉन्टिनेंटल खाद्यकृती व ‘सिंपली सुशी’मध्ये अस्सल चवीचे सुशी खाद्यपदार्थ दिले जातात.

 

या नव्या चित्रपटगृहामध्ये ७५१ प्रेक्षकांना सामावून घेण्याची आणि पुण्यातील या परिसराला सेवा पुरवण्याची क्षमता आहे. पुण्यातील पदार्पणामुळे ‘पीव्हीआर आयनॉक्स’ कंपनीचा महाराष्ट्रात एकूण ५५ चित्रपटगृहे व २७७ स्क्रीन्स तर पश्चिम भारतात ७९ चित्रपटगृहे व ३६७ स्क्रीन्स असा भक्कम विस्तार साधला गेला आहे.

 

विस्तार योजनेबाबत अधिक माहिती देताना ‘पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले, “पुण्याद्वारे पश्चिम विभागात पहिले ‘आयसीई थिएटर’ व पहिला ‘डायरेक्टर्स कट’ अनुभव देताना आम्ही हर्षोत्सुक आहोत. पुण्याची तेजस्वी व गतिशील संस्कृती, समृद्ध परंपरा, बहुभाषक देखणेपण आणि चित्रपट कलेविषयीची सखोल जाण यामुळेच या शहरातील नामांकित जीवनशैली केंद्र असलेल्या ‘कोपा मॉल’मध्ये आमचे नवे चित्रपटगृह सुरू करण्यासाठी परिपूर्ण पार्श्वभूमी निर्माण झाली. या नव्या आऊट-ऑफ-होम ठिकाणाद्वारे पुण्याचा सांस्कृतिक देखावा समृद्ध करण्याची, तसेच प्रेक्षकांना चित्रपटाचे ऐश्वर्य व रममाण करणारे वातावरण असा अनोखा संयोग देण्याची आमची आकांक्षा आहे.”

 

लेक शोअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन पुरी म्हणाले, की ‘कोपा मॉल’मध्ये आम्ही खरेदी व खानपान यांचा अजोड अनुभव निर्माण केला असून पुण्याला उच्च जीवनशैली पुरवणाऱ्या ब्रँड्सचा अनोखा संग्रहही जतन केला आहे. पीव्हीआर आयनॉक्स या आमच्या सहयोगींनी महाराष्ट्र राज्यात पीव्हीआर डायरेक्टर्स कट फॉर्मेटच्या उद्घाटनासाठी कोपाची निवड केल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या पुढाकारामुळे आम्हा दोघा संघटनांमध्ये सखोल मैत्रीचा नवा टप्पा गाठला जात आहे. आमच्या प्रेक्षकांना आम्ही एकत्रितपणे अतुलनीय अनुभव मिळवून देण्यास इच्छुक आहोत.

 

‘डायरेक्टर्स कट’ हा फॉर्मेट ‘पीव्हीआर आयनॉक्स’च्या आलिशानतेचा मुकूटमणी असून त्याने उच्च दर्जाचे आतिथ्य व मनोरंजन यांचा नवा मापदंड स्थापित केला आहे. वैभवी प्रेक्षागृहे, जागतिक दर्जाचे प्रोजेक्शन व सराऊंड साऊंड, आरामशीर उशा व ब्लँकेटसह पूर्ण विसावत चित्रपट पाहण्याचा आनंद देणाऱ्या रिक्लायनेबल आर्मचेअर्स, पर्सनल अटेंडंट कॉल यंत्रणा, खुर्चीत बसल्या जागीच मागवता येणाऱा खाद्य-पेयांचा मेनू, आलिशान लाऊंज अशा प्रत्येक सुविधेमधील तपशील काळजीपूर्वक रचना केला असून त्याचा उद्देश प्रेक्षकांना अत्युच्च सुखसुविधा देण्याचा आहे.

 

‘पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड’च्या लक्झरी कलेक्शन अँड इनोव्हेशन विभागाचे प्रमुख रेनाँ पालिए म्हणाले, “चित्रपटांच्या समृद्धतेची खरीखुरी जाण असलेल्या पुणे शहराने आम्हाला ‘डायरेक्टर्स कट’ व ‘आयसीई थिएटर्स’ यासारख्या विशाल सुपर प्रीमियम प्रेक्षागृहांची बांधणी करण्याची प्रेरणा देणे अगदी स्वाभाविक आहे. येथील ‘गॅट्सबी’च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षक खाद्यरसिकांसाठी सुखावह खानपान व रेस्टो-बारची संकल्पना देण्याची आकांक्षा बाळगली आहे, जी त्यांच्या चित्रपट पाहण्याच्या अनुभवाशी परिपूर्ण पूरक ठरेल.”

 

‘आयसीई इमर्सिव्ह’ हे फ्रान्समधून आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे एक संवेदनात्मक अनुभव आहे त्यात प्रेक्षागृहाच्या प्रत्येक बाजूला एलईडी पॅनेल्स बसवलेली असतात आणि मुख्य पडद्यावर चित्रपट सुरू असताना त्यातील दृश्यांना पूरक ठरणारे चमकदार रंग व आकार त्यावर झळकतात आणि प्रेक्षकांची भवताल दृष्टी भरुन टाकतात. ४के प्रोजेक्शनमुळे तो दृश्यात्मक अनुभव अधिक उत्तम बनतो आणि थ्रीडी डॉल्बी ॲटमॉस ध्वनियंत्रणेमुळे ऑडिओ प्लेबँकचा पुरेपूर आनंद मिळतो. प्रेक्षकांच्या गरजेनुरूप बनवलेल्या ६० सेंटीमीटर रुंद खुर्च्यांची रचना वळणदार रांगांमध्ये केली असल्याने प्रत्येक प्रेक्षकासाठी चित्रपटाचा पडदा नजरेसमोर आदर्श स्थितीत असतो.

 

या चित्रपटगृहामध्ये नजर थक्क करणारी आणि सुधारित अंर्तसजावट असून आधुनिक डौल हे तिचे वैशिष्ट्य आहे. त्यात पांढरा, काळा व करड्या रंगांच्या दगडांचा वापर केला आहे. चित्रपट पाहण्याचा अनुभव उंचावण्यासाठी काळजीपूर्वक केलेली ही रचना प्रेक्षकांचे अनोख्या चित्रपट प्रवासासाठी स्वागत करते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments