Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहात्मा बसवेश्वर जयंती निमित्त १०० शंखनादांची मानवंदना हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने...

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त १०० शंखनादांची मानवंदना हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

 

पुणे : हिंदू वीरशैव लिंगायत मंच यांच्या वतीने महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त १०० शंखनादांची मानवंदना देण्यात आली. दिनांक १० मे रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसेच श्री श्री श्री जगद्गुरु एकोरामाराध्य आणि चैत्रशुद्ध पंचमीला श्री श्री जगद्गुरु मरुळाराध्य यांचा प्रकट दिन अशा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून १०० शंखांचा शंख नाद करून महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक रवी कल्याणे यांनी महात्मा बसवेश्वर यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लेखिका डॉ. शामा घोणसे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी ,स्थायी समिती माजी अध्यक्ष हेमंत रासने, वीरशैव लिंगायत समाज पुणे शहर सचिव किशोर कडेकर, महेश कुगावकर उपस्थित होते.

 

हिंदू वीरशैव लिंगायत मंचाचे शरद गंजीवाले, पुणे महानगर संयोजक अतुल सरडे, ऍड. वैजनाथ विंचुरकर, आशिष हिंगमिरे आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. केशव शंखनाद पथकाने यावेळी शंखनाद केला

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments