Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमावळ लोकसभेसाठी आवश्यक मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ संपन्न* 

मावळ लोकसभेसाठी आवश्यक मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ संपन्न* 

 

 

मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मनुष्यबळाची तिसरी सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, संपर्क अधिकारी सचिन चाटे, पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्राचे समन्वय अधिकारी सागर पासलकर, अजित जोगळेकर, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मनिषा तेलभाते, मावळ, चिंचवड, पिंपरी, पनवेल, उरण तसेच कर्जत विधानसभा निवडणूक कार्यालयातील मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी अनुक्रमे एस. ए मलबारी, किरणकुमार मोरे, मनोज लोणकर, विनोद लचके, प्रशांत आंबिलकर तसेच सचिन राऊत आदी उपस्थित होते.

 

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट लागणार आहेत. यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ५४४ मतदान केंद्रे, कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये ३३९ मतदान केंद्रे, उरण विधानसभा मतदारसंघामध्ये ३४४ मतदान केंद्रे, मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये ३९० मतदान केंद्रे, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ५४९ मतदान केंद्रे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये ४०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये २ हजार ८५२ मतदान केंद्राध्यक्ष, ८ हजार ५५६ मतदान अधिकारी यांच्यासह ७६ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश असून सर्व विधानसभा मतदारसंघाना आवश्यक अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला आहे.

 

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी ६०३ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार ८०९ मतदान अधिकारी तसेच ३ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी ३७७ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार १३१ मतदान अधिकारी तसेच २९ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उरण विधानसभा मतदारसंघासाठी ३८२ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार १४६ मतदान अधिकारी तसेच २१ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी ४३५ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार ३०५ मतदान अधिकारी तसेच ४ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ६०९ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार ८२७ मतदान अधिकारी तसेच १४ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी ४४६ मतदान केंद्राध्यक्ष, १ हजार ३३८ मतदान अधिकारी तसेच ५ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना रविवार दि. १२ मे २०२४ रोजी विधानसभा निवडणूक कार्यालयनिहाय निश्चित केलेल्या स्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान साहित्य त्यांच्याकडे सुपूर्त केले जाईल. सायंकाळपर्यंत मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक त्यांना नेमून दिलेल्या केंद्राच्या ठिकाणी पोहचतील असे नियोजन करण्यात आले आहे.

 

सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच आपसात समन्वय ठेवून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी दिले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments