Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकसभा निवडणूक मतदानानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल*

लोकसभा निवडणूक मतदानानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल*

 

 

पुणे दि. १२ : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाच्या मतदानाकरीता सोमवार १३ मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर केल्याने प्रादेशिक परिवहन मुख्यालय, दिवे ब्रेक टेस्ट ट्रॅक, ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर) नाशिक फाटा आणि आळंदी रस्ता येथील कामकाजात बदल करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

 

या सर्व ठिकाणी वाहन अनुज्ञप्ती, योग्यता प्रमाणपत्र, नूतनीकरण, वाहन नोंदणी व इतर सर्व कामकाज आणि १३ मे रोजीची पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या वाहनधारक आणि उमेदवारांची वाहन तपासणी, चाचणी किंवा संबंधित कामकाज १४ ते १७ मे या कालावधीत होईल. या बदलाची वाहनधारकांनी, उमेदवारांनी नोंद घेवून बदल केलेल्या तारखेला नियोजित ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments