मुंबई,भारत – मे १०, २०२४: सॅमसंग इंडियाने मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) येथे रोडशोचे आयोजन केले, जेथे इन्स्टिट्यूटच्या इन्क्यूबेटरमधील इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांनी जगभरातील प्रचलित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सॉल्व्ह फॉर टूमारोमध्ये सहभाग घेण्याचा त्यांचा हेतू दाखवला. सॉल्व्ह फॉर टूमारो ही राष्ट्रीय शैक्षणिक व नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे, जिचा देशाच्या भावी पिढीमध्ये नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण संस्कृती बिंबवण्याचा मनसुबा आहे.
विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जास्रोत म्हणून पर्यायी कच्च्या मालाचा वापर यांसारख्या वास्तविक विश्वामधील समस्यांचे निराकरण करण्याप्रती कटिबद्धता दाखवली. ते म्हणाले की त्यांना सॅमसंगच्या ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ सारख्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे, जे त्यांना त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यास आणि व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मदत करण्यासाठी मार्गदर्शन व पाठिंबा देऊ शकते.
AiRTHच्या नाविन्यपूर्ण एअर प्युरिफिकेशन उत्पादनांच्या माध्यमातून आपल्याला श्वासोच्छ्वासासाठी शुद्ध हवा मिळवून देण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणत असलेले AiRTH चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कौशिक यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि AiRTH ची निर्मिती करण्यासह त्यांच्या यशोगाथा व सामना केलेल्या आव्हानांना सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तविक विश्वातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा विचार करण्यास देखील प्रेरित केले.
सॅमसंगने ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’च्या तिसऱ्या सीझनसाठी नुकतेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआयटीवाय)चे स्टार्टअप हब आणि फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (एफआयटीटी), आयआयटी दिल्ली यांच्यासोबत सहयोगाची घोषणा केली आहे.
यंदा ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ उपक्रमाने दोन विशिष्ट ट्रॅक्स – स्कूल ट्रॅक व युथ ट्रॅक सादर केले आहेत. हे प्रत्येक ट्रॅक विशिष्ट थीमला चालना देण्याप्रती समर्पित आहेत आणि विविध वयोगटातील व्यक्तींवर लक्ष्य करतात. दोन्ही ट्रॅक्स एकाच वेळी राबवण्यात येतील, ज्यामधून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान खेळाच्या मैदानाची खात्री मिळेल.
स्कूल ट्रॅक १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ थीमवर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक वंचित समूहांची प्रगती करण्याचे, सामाजिक नवोन्मेष्कारांच्या माध्यमातून सर्वांना आरोग्य व सामाजिक सर्वसमावेशकता उपलब्ध करून देण्याचे महत्त्व सादर करतो, म्हणून ‘सॉल्व्हींग फॉर इंडिया’ आहे.
दुसरीकडे, युथ ट्रॅक १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्यक्तींवर लक्ष्य करण्यासह थीम ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’वर लक्ष केंद्रित करतो. हा ट्रॅक कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व शाश्वततेला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांना महत्त्व देतो, म्हणून ‘सॉल्व्हींग फॉर वर्ल्ड’ आहे.
तरूण व्यक्त्ती ९ एप्रिल २०२४ पासून ३१ मे २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत www.samsung.com/in/solvefortomorrow या वेबसाइटवर सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोसाठी अर्ज करू शकतात.
सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो बाबत माहिती
कोण सहभाग घेऊ शकतो: स्कूल ट्रॅकमध्ये १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थी – वैयक्तिक किंवा जवळपास ५ सदस्यांच्या टीम्स ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ थीममध्ये त्यांच्या संकल्पना सबमिट करू शकतात आणि युथ ट्रॅकमध्ये १८ ते २२ वर्ष वयोगटातील व्यक्ती – वैयक्तिक किंवा जवळपास ५ सदस्यांच्या टीम्स ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टेनेबिलिटी’ थीममध्ये त्यांच्या संकल्पना सबमिट करू शकतात.
अॅप्लीकेशन थीम्स:
स्कूल ट्रॅक अंतर्गत थीम ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ आरोग्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करत, अध्ययन पद्धती सुधारत आणि शिक्षण उपलब्ध करून देत वंचित समूहांना सक्षम करण्यासाठी गरजांची पूर्तता करते, ज्यामधून सर्वांसाठी सामाजिक सर्वसमावेशकतेची खात्री मिळते.
युथ ट्रॅक अंतर्गत थीम ‘एन्व्हायरोन्मेंट अँड सस्टनेबिलिटी’ पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर, कार्बनचे प्रमाण कमी करण्यावर आणि शाश्वततेला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करेल.
सहभागींना काय मिळेल:
सॅमसंग, एमईआयटीवाय, आयआयटी-दिल्ली यांच्यासह विविध उद्योग तज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि युनायटेड नेशन्स इन इंडियाकडून टेक्निकल सपोर्ट. तसेच, सहभागींना त्यांच्या संकल्पनांना प्रोटोटाइपमध्ये बदलण्यासाठी विशेष मार्गदर्शन व कोचिंग, सॅमसंग लीडर्ससोबत केंद्रित परस्परसंवादांसह क्यूरेटेड इनोव्हेशन वॉकला उपस्थित राहण्याची संधी आणि प्रोटोटाइप विकास व सुधारणेसाठी उपलब्धीनुसार अनुदान मिळेल.
स्कूल ट्रॅक: उपांत्य फेरीमधील १० टीम्सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्सी टॅब्स मिळतील. अंतिम फेरीमधील ५ टीम्सना प्रोटोटाइप सुधारणेसाठी प्रत्येकी १ लाख रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्सी वॉचेस् मिळतील.
युथ ट्रॅक: उपांत्य फेरीमधील १० टीम्सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्सी लॅपटॉप्स मिळतील. अंतिम फेरीमधील ५ टीम्सना प्रोटोटाइप सुधारणेसाठी प्रत्येकी १ लाख रूपये अनुदान आणि सॅमसंग झेड फ्लिप स्मार्टफोन्स मिळतील.
विजेत्यांना काय मिळेल:
स्कूल ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्युनिटी चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांची सीड अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या स्कूल्सना शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, समस्या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग प्रॉडक्ट्स देखील मिळतील.
युथ ट्रॅक: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘एन्व्हायरोन्मेंट चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि आयआयटी-दिल्ली येथे इन्क्यूबेशनसाठी ५० लाख रूपयांचे अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या कॉलेजेसना त्यांच्या शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, सामाजिक उद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग उत्पादने देखील मिळतील.
सहभागी कुठे अर्ज करू शकतात: www.samsung.com/in/solvefortomorrow
केव्हापासून: ९ एप्रिल २०२४ पासून
केव्हापर्यंत: ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)
अधिक माहितीसाठी आणि भारतातील स्पर्धेकरिता नोंदणी करण्यासाठी www.samsung.com/in/solvefortomorrow येथे भेट द्या. अर्जनोंदणी ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बंद होईल.
२०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम सॉल्व्ह फॉर टूमारो सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्यासोबत भावी लीडर्सना सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सीएसआर प्रयत्नांबाबतच्या अधिक गाथा आमचे सीएसआर पेज http://csr.samsung.com यावर वाचा.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कं. लि. बाबत
सॅमसंग परिवर्तनशील संकल्पना व तंत्रज्ञानांसह जगाला प्रेरित करते आणि भविष्याला आकार देते. कंपनी टीव्ही, स्मार्टफोन्स, वीअरेबल डिवाईसेस, टॅब्लेट्स, होम अप्लायन्सेस, नेटवर्क सिस्टम्स व मेमरी, सिस्टम एलएसआय, फाऊंड्री आणि एलईडी सोल्यूशन्स या विश्वांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, तसेच आपली स्मार्टथिंग्ज इकोसिस्टम आणि भागीदारांसोबत खुल्या सहयोगाच्या माध्यमातून एकसंधी कनेक्टेड अनुभव देत आहे. सॅमसंग इंडियावरील नवीन बातम्यांसाठी कृपया सॅमसंग इंडिया न्यूजरूमला http://news.samsung.com/in येथे भेट द्या. हिंदीसाठी सॅमसंग न्यूजरूम भारतला https://news.samsung.com/bharat येथे भेट द्या. तुम्ही आम्हाला ट्विटरवर @SamsungNewsIN येथे फॉलो करू शकता.


