Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedचेलाराम फाऊंडेशन तर्फे चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक सुरू

चेलाराम फाऊंडेशन तर्फे चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक सुरू

पुणे,20 मे 2024 : आरोग्य आणि कल्याणासाठी समग्र दृष्टीकोनाद्वारे सेवा प्रदान करण्याच्या उद्दिष्टाने चेलाराम फाऊंडेशन तर्फे चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.आपले वडील कै. श्री. लोकुमल के. चेलाराम आणि आजोबा कै. श्री. किशनचंद चेलाराम यांनी स्थापन केलेल्या परंपरेनुसार श्री लाल एल. चेलाराम यांच्या मार्गदर्शनाखाली चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

20,000 चौरस फुटांमध्ये विस्तारलेल्या या केंद्रामध्ये आधुनिक वैज्ञानिक उपकरणे,आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील कुशल व्यावसायिक तंत्रज्ञ आणि थेरपिस्ट आणि न्युट्रिशनशनल कॅफेटेरियाचा समावेश आहे.

चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिकचा भर हा रोगप्रतिबंध व चांगल्या आरोग्यावर असून याच्या शाश्‍वततेसाठी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्यावर असणार आहे.त्यासाठी विविध सेवा व वेलनेस पॅकेजेस प्रदान केले जातील.सेवांमध्ये जिम्नॅशियम,फिजिओथेरपी,हायपरबॅरिक,ऑक्सिजन थेरपी,सायरोथेरपी,हायड्रोजन थेरपी,ओझोन थेरपी,आयुर्वेद व पंचकर्म,होमिओपॅथी,इन्फ्रारेड सौनाथेरपी,रेडलाईट थेरपी,मसाज थेरपी,स्टीम बाथ,मिनरल फोर थेरपी,रिफ्लेक्सोलॉजी इत्यादीचा समावेश आहे.शारीरिक,भावनिक,मानसिक आणि अध्यात्मिक तंदुरूस्तीचे एकत्रीकरण घडवून आणण्यासाठी व आरोग्यामध्ये सर्वांगीण परिवर्तन करण्यासाठी 15 विविध वेलनेस पॅकेजेस या केंद्रामध्ये प्रदान केले जातील.सामान्य वेलनेसच्या पलीकडे जाऊन अद्ययावत ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान आरोग्य कल्याणासाठी प्रदान करणारे हे अल्ट्रा वेलनेस क्लिनिक आहे.

चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक हा उपक्रम सामान्य लोकांना उत्तम जीवन जगण्यासाठी सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.एकात्मिक दृष्टीकोनासह शारीरिक,मानसिक,भावनिक आणि अध्यात्मिक पैलूंना अंर्तभूत करत विविध सेवा व पध्दती एकत्रित करत परिवर्तनशील आणि उत्तम उपचार अनुभव प्रदान करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

चेलाराम फाऊंडेशनचे प्रणेते श्री. लाल चेलाराम म्हणाले की,आरोग्याला चालना देणारे,आजारांना प्रतिबंध करणारे आणि मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी वैज्ञानिक उपचार पध्दतींवर आधारित सुविधा,साधने आणि तज्ञांचे मार्गदर्शन समुपदेशनाद्वारे सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.उन्नीकृष्णन ए.जी. म्हणाले की,चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक हे प्रतिबंध आणि उपचार यामधील अंतर भरून काढण्यास प्रयत्न करेल.चांगल्या आरोग्याच्या दिशेने मानसिक,शारीरिक,भावनिक संतुलनासाठी सर्वांगीण दृष्टीकोनावर येथे भर दिला जाईल.

चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिकचे मुख्य कामकाज अधिकारी विश्वास वलावलकर म्हणाले की,आरोग्यासाठी अद्वितीय एकात्मिक दृष्टीकोन वापरून प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे केंद्र वैयक्तिकृत देखभाल आणि दर्जेदार सेवा प्रदान करते.रोगविरहित जीवनासाठी पारंपारिक वैद्यकीय पद्धती आणि पूरक आणि पर्यायी उपचार एकत्रितपणे प्रदान करणे हा आमचा दृष्टीकोन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments