Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपहाटे पर्यंत सुरु राहणाऱ्या खाद्य पेय दुकानां बाबत मनपा आयुक्त आणि...

पहाटे पर्यंत सुरु राहणाऱ्या खाद्य पेय दुकानां बाबत मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना निवेदन सादर

पुणे, पुणे शहरात नव्याने रुजू पाहणारी संस्कृती शहराला घातक आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
पुण्यातील नाईट लाईफ बाबत ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु असून केवळ पब संस्कृतीच नव्हे तर रस्त्यावर किंवा काही प्रमुख चौकांमध्ये देखील “रात्रीस खेळ चाले” अशी परिस्थिती आहे.नळस्टॉप चौकातील खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल व हातगाड्यांबद्दल तेथील नागरिक तक्रार करून दमलेत.नळस्टॉप चौकातील सर्वदर्शन सोसायटी ने तर सर्वत्र अर्ज केले, कोणतेही एन ओ सी दिले नसताना त्यांच्या येथे पहाटे पर्यंत तरुण तरुणींचा धिंगाणा आपण इंस्टाग्राम वर पण बघू शकतो.
त्यात भर की काय म्हणून पुढे एस एन डी टी कॉलेज समोर असलेल्या मेट्रो स्टेशन समोर आता एक खाऊ गल्ली सुरु होतं असून तेथे 24×7 चा फलक लागला आहे.
अश्या सर्व प्रकरणात आता पोलीस आणि मनपा ने संयुक्त कारवाई करणे गरजेचे असून हा केवळ पुण्याची संस्कृती रक्षणाचा विषय नसून भावी पिढीला विनाशापासून वाचविण्यासाठी आता कठोरतम कारवाई करावी अशी आग्रही मागणी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments