पुणे, २४ मे २०२४ : समाजाप्रती असलेल्या आपली अथक वचनबद्धता दर्शवत ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) तर्फे ‘समर्थ असिस्टिव्ह डिव्हायसेस कॉन्क्लेव्ह’ चे आयोजन करण्यात आले होते. ह्युंडाई मोटर इंडियाच्या ‘समर्थ बाय ह्युंडाई ‘ या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कंपनीची बांधिलकी प्रकर्षाने समोर आली . ह्युंडाई मोटर इंडिया ने,आपली एनजीओ भागीदार समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डच्या सहकार्याने, समर्थ असिस्टिव्ह डिव्हाइसेस प्रोग्राम अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना 72 तांत्रिकदृष्ट्या प्रगत सहाय्यक उपकरणे प्रदान केली.हा कार्यक्रम ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशन आणि समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड यांच्यातर्फे चालवला जातो.सहाय्यक उपकरणे पुरविण्याचा हा उपक्रम दिव्यांग व्यक्तींसाठी अधिक समावेशक जीवन निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘समर्थ’ उपक्रमांतर्गत, एचएमआयएफ चे पुढील तीन वर्षांत ६८४ सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये श्रवणयंत्र, व्हील चेअर, अंधांसाठी डिजिटल किट, बायोनिक अवयव आणि इतर उपकरणांचा समावेश आहे.
ह्युंडाई मोटर इंडिया तर्फे ‘समर्थ’ उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे प्रदान
RELATED ARTICLES


