Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाविसा फौंडेशन' तर्फे आयोजित पुस्तक मेळा उद्यापासून

भाविसा फौंडेशन’ तर्फे आयोजित पुस्तक मेळा उद्यापासून

‘
पुणे, ता. ५ – भारतीय विचार साधना फाऊंडेशन, पुणे तर्फे राष्ट्रीय पुस्तक मेळा – कोथरूड चे आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून (शुक्रवार, ७ जून) सुरू होणारे हे पुस्तक व ग्रंथ प्रदर्शन व विक्री तीन दिवस म्हणजे रविवार, ९ जून रोजीपर्यंत चालणार आहे.

मयूर कॉलनी, कोथरूड स्थित बालशिक्षण मंदिर आवारातील IMCC च्या तळमजला व परिसरात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी या तिनही भाषांतील ५२ प्रकाशन संस्थांची १ हजार २०० हून अधिक टायटल्स असलेली राष्ट्रीय विचारांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या पुस्तकांच्या खरेदीवर १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.

बालशिक्षण मंदीर व IMCC इमारतीच्या तळमजला परिसरात ग्रंथ प्रदर्शन व राष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम आयएमसीसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहेत.

या मेळ्यात तीनही दिवस लेखकांशी संवाद व पुस्तक प्रकाशन समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मेळ्याच्या निमित्ताने तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन होणार असून पहिल्या दिवशी (शुक्रवार, ७ जून २४ रोजी) लेखक व अभ्यासक अक्षय जोग यांच्या ‘दुर्लक्षित हिंदू हितवादी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सायंकाळी ४ वाजता होणार आहे. आयएमसीसीच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्तंभलेखक विनय सहस्त्रबुद्धे तसेच माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

शनिवार, ८ जून रोजी प्रसिद्ध लेखक राजीव तांबे यांचा लहान मुलांशी गप्पांचा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ५ या वेळात रंगणार आहे. त्यानंतर श्री. तांबे यांच्या हस्ते व कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव यांच्या उपस्थितीत ‘मुद्याची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन सायंकाळी ५ वाजता होणार आहे. आयएमसीसीच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये हा प्रकाशन सोहळा होईल.

तर, तिसऱ्या दिवशी रविवार, ९ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘फाळणीच्या वेदना’ या सांस्कृतिक वार्तापत्राच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम देखील आयएमसीसीच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे.

साहित्य रसिकांनी या मेळ्यास ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी व सवलतीसह पुस्तक खरेदीची संधी साधावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments