पुणे, 9 जून 2024: पूना क्लब यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2024 स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात गोयल गंगा रिअल रिच, कुदो, जेट्स, परमार ऑल स्टार्स या संघानी आगेकूच केली.
पूना क्लब स्विमिंग पूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात समायरा मास्टर, निष्का शहा, आदित्य सिंग, नफिसा हसिम यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गोयल गंगा रिअल रिच संघाने 224गुणांसह आघाडी मिळवत बाद फेरी गाठली. तर, कुदो संघाने 211 गुणांसह दुसरे व जेट्स संघाने 199 गुणांसह तिसरे स्थानासह बाद फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेत 150 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. याआधी स्पर्धेचे उदघाटन पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, स्पर्धेचे प्रायोजक वेंकीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी राव, जगदीश राव, पूना क्लबचे उपाध्यक्ष व स्पर्धेचे चेअरमन गौरव गढोके, एएसआर डॉल्फिन्सचे मालक अमित रोपलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक तुषार आसवानी, क्लबचे सचिव कर्नल सरकार, क्लबचे समिती सदस्य शुभा गडकरी, समीर संघवी व कुणाल संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: साखळी फेरी: प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमानुसार:
10 वर्षांखालील (महिला) फ्री स्टाइल (20 मी): 1. समायरा मास्टर (रिअल रिच,15:90से), 2.लारा वासवानी (परमार ऑल स्टार्स, 17:10 से), 3.येवा रोपलेकर (एएसआर डॉल्फिन्स,19:22 से);
10 वर्षांखालील (पुरुष) फ्री स्टाईल (20 मी): 1.आरव नंदा (परमार ऑल स्टार्स, 17:37से), 2.रुतम इराणी (19:78से), 3.जयव्रत जैन (रिअल रिच, 20:81से);
14 वर्षांखालील (11-14वर्षे)(महिला) फ्री स्टाईल(40 मी): 1.अनिका शेट्टी(जेट्स, 27:99से), 2.मिहिका मोहिते (एएसआर डॉल्फिन्स, 29:30 से), 3.दिव्यांका भोसले(हिलयॉस ईगल्स, 30:25 से);
14 वर्षांखालील (11-14 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाइल (40 मी): 1.विहान तुळपुळे (जेट्स, 25:20 से), 2.रयान संघवी (परमार ऑल स्टार्स, 27:93से), 3.अरुल आगरकर (रिअल रिच, 30:91 से);
14 वर्षांखालील (11-14वर्षे) (महिला)ब्रेस्टस्ट्रोक(40मी): 1.मिहिका मोहिते(एएसआर डॉल्फिन्स, 36:03से), 2.दिव्यांका भोसले(हिलयॉस ईगल्स, 37:60 सेकंद), 3.अनिका शेट्टी(जेट्स, 37:95 से);
17 वर्षांखालील (15-17 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाईल (40मी): 1.राजवीर पाटील (एएसआर डॉल्फिन्स, 21:63 से.), 2.आरव बोरावके (जेट्स, 24:34 से.), 3.आरव दिवटे (रिअल रिच, 24:90 से);
23 वर्षांखालील (15-23 वर्षे) (महिला) फ्री स्टाईल (40 मी): 1.इलिशा शहा (परमार ऑल स्टार्स, 28:57सेकंद), 2.झाहरा मास्टर (जेट्स, 28:68से), 3.निष्का शाह (रिअल रीच, ,30:91से);
33 वर्षांखालील (18-33 वर्षे) (पुरुष) फ्री स्टाईल (40 मी): 1.रोहन माली (हिलयॉस ईगल्स, 22:90 से), 2.देवर्या राठी (परमार ऑल स्टार्स, 25:28से), 3.सुमेर परवानी (रिअल रीच) , 26:93 से);
23 वर्षांखालील (15-23 वर्षे) (महिला)ब्रेस्टस्ट्रोक (40 मी): 1.निष्का शहा (रिअल रीच, 37:66 सेकंद), 2.वेद कनासिया (एएसआर डॉल्फिन्स, 38:25सेकंद), 3.झाहरा मास्टर (जेट्स, 43:75से);
५२ वर्षांखालील (३४-५२ वर्षे) (पुरुष) फ्रीस्टाइल (४० मी): १.आदित्य सिंग (रिअल रीच, २६:०९ से), २.प्रमीत सूद (जेट्स, २७:४७ से), ३.कुणाल संघवी (परमार ऑल स्टार्स, 28:00 से);
35 वर्षांखालील(महिला) फ्रीस्टाइल(40 मी): 1.नफिसा हसिम (रिअल रीच, 36:44सेकंद), 2.फातेमा बेकर (परमार ऑल स्टार्स, 40:90 सेकंद), 3.तेहरात विंझेनेकर (जेट्स, 41:72 से);
54 वर्षावरील (पुरुष) फ्री स्टाईल (20 मी): 1. दिलीप देशमुख (जेट्स, 15:16 से), 2. समीर सय्यद (रिअल रीच, 17:19 से), 3.राज मसंद (एएसआर डॉल्फिन्स, 20:10 से);
बॅकस्ट्रोक खुला महिला(४० मी): 1.मिहिका मोहिते(एएसआर डॉल्फिन्स, 35:88से), 2.अनेका शेट्टी(जेट्स,36:50से), 3.निष्का शाह (रिअल रीच, 43:87 से);
ब्रेस्टस्ट्रोक खुला पुरुष(40 मी): 1.राजवीर पाटील (एएसआर डॉल्फिन, 2972 से), 2.आरव दिवटे (रिअल रीच, 34:22 से.), 3.ध्रुव राठी (परमार ऑल स्टार्स, 35:00 से);
बॅकस्ट्रोक खुला पुरुष गट(40 मी):1.रोहन माली(हिलयॉस ईगल्स, 26:19से), 2.आरव बोरावके(जेट्स, 33:54से), 3.सुमेर परवानी (रिअल रीच, 35:53से) ;
रिले महिला: फ्री स्टाईल(2×20मी व 2×40मी): 1.फातिमा बाकर/इलिशा शहा/अमया शेट्टी/लारा वासवानी(परमार ऑल स्टार्स, 01:38:00से), 2.नफिसा हसीम/निष्का शहा/अनुष्का राठी/समायरा मास्तर(रिअल रिच, 01:40:78से), 3.रेखा शहा/भक्ती बुलानी/मिहिका मोहिते/येवा रोपलेकर(01:42:28से);
रिले पुरुष: फ्री स्टाईल(2×20मी आणि 3×40मी): 1.समीर सय्यद/आदित्य सिंग/आरव दिवटे/अरुल आगरकर/आदित्य सिंग(रिअल रीच, 01:44:15से), 2.दिलीप देशमुख/प्रमोत सूद/आरव बोरवाके/विहान तुळपुळे/रयान बाकर(01:46:81सेकंद) ), 3.रमेश संघवी/कुणाल संघवी/देवर्या राठी/रयान संघवी/आरव नंदा(परमार ऑल स्टार्स,01:50:56से).


