Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून अल्‍ट्रोज रेसर लाँच

टाटा मोटर्सकडून अल्‍ट्रोज रेसर लाँच

मुंबई, जून ७, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने आज कंपनीच्‍या प्रीमियम हॅचबॅकची स्‍पोर्टी अवतार ‘अल्‍ट्रोज रेसर’च्‍या लाँचची घोषणा केली. अल्‍ट्रोजमधील कार्यक्षमता पैलूंना १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिनच्‍या सादरीकरणासह नव्‍या उंचीवर नेण्‍यात आले आहे. रेस कार प्रेरित एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअर लुक, तसेच ५५०० आरपीएममध्‍ये १२० पीएस शक्‍ती आणि १७५० ते ४००० आरपीएममध्‍ये १७० एनएम टॉर्कसह अल्‍ट्रोजचे हे स्‍पोर्टी इवॉल्‍युशन प्रत्‍येक ड्राइव्‍हदरम्‍यान रोमांचक प्रवासाच्‍या अनुभवाची खात्री देते.

सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली रेसर अल्‍ट्रोजची टॉप ऑफ लाइन व्‍हर्जन ठरेल. या वेईकलमध्‍ये ३६० डिग्री कॅमेरा, २६.०३ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट टचस्क्रिन, व्‍हेण्टिलेटेड सीट्स आणि ६ एअरबॅग्‍ज (रेसरमध्‍ये प्रमाणित) अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. ही ६ स्‍पीड मॅन्‍युअल गिअरबॉक्स असलेली एकमेव हॅचबॅक आहे, ज्‍यामधून शहरातील ट्रॅफिकमध्‍ये आणि महामार्गांवर उत्तम ड्राइव्‍हेबिलिटीची खात्री मिळते. सुधारित तंत्रज्ञान, वैशिष्‍ट्ये आणि हॅचबॅकमधील दर्जात्‍मक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह अल्‍ट्रोज रेसर तीन रंगांच्‍या पर्यायांसह (प्‍युअर ग्रे, अॅटोमिक ऑरेंज व अव्‍हेन्‍यू व्‍हाइट) ३ व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये (आर१, आर२ व आर३) उपलब्‍ध असेल. तसेच, अल्‍ट्रोज लाइन अपमध्‍ये अधिक भर करत टाटा मोटर्सने आपल्‍या अल्‍ट्रोज श्रेणीमध्‍ये दोन नवीन व्‍हेरिएण्‍ट्स (एक्‍सझेल लक्‍स व एक्‍सझेड+ एस लक्‍स) आणि एक अपग्रेडेड व्‍हेरिएण्‍ट (एक्‍सझेड+ओएस) देखील लाँच केले आहे. हे दोन नवीन अतिरिक्‍त व्‍हेरिएण्‍ट्स पेट्रोल मॅन्‍युअल, पेट्रोल डीसीए, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन्‍स पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असतील.

किंमत तक्‍ता:

रेसर व्‍हेरिएण्‍ट्स

सुरूवातीची किंमत (पेट्रोल एमटी), रूपयांमध्‍ये, एक्‍स-शोरूम, दिल्‍ली

आर१

९,४९,०००

आर२

१०,४९,०००

आर३

१०,९९,०००

व्‍हेरिएण्‍ट्स

सुरूवातीची किंमत (पेट्रोल एनए एमटी), रूपयांमध्‍ये, एक्‍स-शोरूम, दिल्‍ली

एक्‍सझेड लक्‍स (नवीन)

८,९९,९००

एक्‍सझेड+एस लक्‍स (नवीन)

९,६४,९९०

एक्‍सझेड+ओएस (अपग्रेडेड)

९,९८,९००

टाटा अल्‍ट्रोज रेसरच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, “अल्‍ट्रोज लाइन अप प्रबळ करत आम्‍हाला अल्‍ट्रोज रेसर लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. ही कार प्रवाशांच्‍या दैनंदिन ड्राइव्‍हमध्‍ये उत्‍साहाची भर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या कारमधील उच्‍च पॉवर आऊटपुटसह विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये आणि तंत्रज्ञान-केंद्रित दृष्टिकोन रेसरला कनेक्‍टेड व फॅशन फॉरवर्ड असलेल्‍या आणि त्‍यांना वरचढ ठरवणारी कार ड्राइव्‍ह करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आधुनिक काळातील ग्राहकांसाठी हवीहवीशी बनवतात. आम्‍हाला विश्‍वास आहे की, कार्यक्षमता केंद्रित डीएनए आणि रेस कार प्रेरित लुकसह ही कार परिपूर्ण सोबती ठरेल, जी तुम्‍हाला #RacePastTheRoutine ची भावना देईल.”

अल्‍ट्रोज रेसर व्‍हेरिएण्‍ट वैशिष्‍ट्ये

आर१

आर२

आर३

ओव्‍हर आर१

ओव्‍हर आर२

आर१६ अलॉई व्‍हील्‍स

इलेक्ट्रिक सनरूफसह वॉईस असिस्‍ट

आयआरए कनेक्‍टेड कार टेक

६ एअरबॅग्‍ज

वायरलेस चार्जर

फ्रण्‍ट व्‍हेण्टिलेटेड सीट्स (सेगमेंट फर्स्‍ट)

लेदरेट सीट्स

१७.७८ सेमी टीएफटी डिजिटल क्‍लस्‍टर

एअर प्‍युरिफायर

२६.०३ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट

स्टिअरिंग माऊंटेड क्‍लस्‍टर कंट्रोल

वायरलेस एए आणि एसीपी

३६० डिग्री कॅमेरा

पीईपीएस

एक्‍सप्रेस कूल

एलईडी डीआरएलएस

रिअर आर्मरेस्‍ट

रिअर वायपर्स आणि वॉश

४ स्‍पीकर्स + ४ ट्विटर्स

एफएटीसी

प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स

फ्रण्‍ट फॉग लॅम्‍प्‍स

रिअर डिफॉगर

फ्रण्‍ट स्‍लायडिंग आर्मरेस्‍ट

ऑल फोर पॉवर विंडोज

इलेक्ट्रिकली अॅडजस्‍टेबल व ऑटोफोल्‍ड ओआरव्‍हीएम

क्रूझ कंट्रोल

हाइट अॅडजस्‍टेबल ड्रायव्‍हर सीट

रिअर एसी व्‍हेण्‍ट्स

ऑटो हेडलॅम्‍प्‍स आणि रेन सेन्सिंग वायपर्स

एक्‍सझेड लक्‍स, एक्‍सझेड+एस लक्‍स, एक्‍सझेड+ओएस ट्रिम्‍समधील वैशिष्‍ट्ये

एक्‍सझेड लक्‍स

एक्‍सझेड+एस लक्‍स

एक्‍सझेड+ओएस

एक्‍सझेडची सर्व वैशिष्‍ट्ये

एक्‍सझेड+एसची सर्व वैशिष्‍ट्ये

एक्‍सझेड+एस लक्‍सची सर्व वैशिष्‍ट्ये

२६.०३ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट

६ एअरबॅग्‍ज

आयआरए कनेक्‍टेड कार टेक

३६० डिग्री कॅमेरा

२६.०३ सेमी इन्‍फोटेन्‍मेंट

एअर प्‍युरिफायर

वायफायवर एए आणि एसीपी

३६० डिग्री कॅमेरा

वायफायवर एए आणि एसीपी

२.५ लाख आनंदी ग्राहकांसह अल्‍ट्रोजने ट्रेलब्‍लेझिंग डिझाइन, सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये, उत्‍साहवर्धक कार्यक्षमता आणि आत्‍मविश्‍वास-प्रेरित सुरक्षिततेच्‍या माध्‍यमातून भारतातील प्रीमियम हॅचबॅक्‍ससाठी बेंचमार्क स्‍थापित केला आहे. ही कार अनेक बाबींमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, जेथे प्रतिष्ठित ५ स्‍टार ग्‍लोबल एनसीएपी सेफ्टी रेटिंग मिळवणारी भारतातील पहिली हॅचबॅक आणि ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान असलेली देशातील पहिली सीएनजी कार आहे. तसेच ग्राहकांना निवडण्‍यासाठी अनेक पॉवरट्रेन पर्याय देणारी एकमेव हॅचबॅक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments