पुणे, 15 जून 2024: भारतातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात विशेषत: यूएस, यूके आणि ऑस्ट्रेलिया जात असतात, परंतु आपली वैविध्यपूर्ण संस्कृती, परंपरा, समृद्ध इतिहास आणि प्राचीन ज्ञानामुळे भारतामध्ये जगाचे शैक्षणिक केंद्र बनण्याची क्षमता आहे असे मत मालदीव मधील भारताचे माजी उच्चायुक्त श्री. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
क्राईस्ट युनिव्हर्सिटी, लवासाचा नववा दीक्षांत समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे श्री.ज्ञानेश्वर मुळे ,क्राईस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू फादर डॉ . जोसेफ सीसी, क्राईस्ट युनिव्हर्सिटी लवासाचे संचालक व अधिष्ठाता फादर डॉ.लिजो थॉमस, निबंधक अनिल जोसेफ पिंटो , शैक्षणिक निबंधक डॉ. जॉनी जोसेफ आणि विविध विभाग प्रमुख, विद्यार्थी व पालक उपस्थित होते .
या भव्य दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.बिझनेस आणि मॅनेजमेंट, इकोनॉमिक्स आणि ॲनालिटिक्स, डेटा सायन्स, लॉ, कॉमर्स यासह विविध अभ्यासक्रमातील सुमारे 605 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.या दीक्षांत समारंभात 407 पदवी, 195 पदव्युत्तर आणि 3 पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या भव्य समारंभात रँक धारक आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एमबीए , बीएससी आणि एमएससी (इकॉनॉमिक्स अँड ऍनालीटीक्स ), बीएससी आणि एमएससी (डेटा सायन्स), कायदा आणि वाणिज्य यासह विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांमधील 605 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. दीक्षांत समारंभात पदवीपूर्व अभ्यासक्रमातील 407 विद्यार्थी, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील 195 आणि 3 पीएचडी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या .
प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर मुळे, यांनी 10 वर्षे पूर्ण केल्याबद्दल क्राइस्ट युनिव्हर्सिटीचे अभिनंदन केले.त्यांनी सांगितले की पदवी म्हणजे नवीन जबाबदारी सुरू होते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती असली पाहिजे आणि देशाचा सर्वांगीण विकासमध्ये योगदान दिले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या जगात विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास करत उद्योग व समाजात मोलाची भर घातली पाहिजे.
क्राईस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू जोसेफ सीसी म्हणाले की, 1969 मध्ये क्राईस्ट युनिव्हर्सिटीची कॉलेज म्हणून सुरू झाली होती, आता भारतभरात सहा ठिकाणी कॅम्पससह विद्यापीठात विस्तार झाला आहे. ते पुढे म्हणाले की, दीक्षांत समारंभ हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो,कारण केवळ पदवी नाही,तर मिळवलेले ज्ञान, बनलेली मैत्री आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आकार देणारे अनुभव यांचाही समावेश असतो
क्राईस्ट युनिव्हर्सिटी लवासाचे संचालक व अधिष्ठाता डॉ.लिजो थॉमस यांनी सांगितले की, क्राईस्ट युनिव्हर्सिटीचे हे एकमेव निवासी कॅम्पस आहे.आम्ही 2014 मध्ये फक्त 12 विद्यार्थ्यांसह सुरुवात केली होती आणि आज आमच्याकडे 2000 विद्यार्थी आहेत.याचबरोबर आज एलएलबी बॅचचा पहिला दीक्षांत समारंभ आहे .


