अग्निशमन विभागाकडून जाधववाडी येथील आग आटोक्यात————————————————————————————पिंपरी दि. ५ डिसेंबर २०२३:- चिखली येथील जाधववाडीमध्ये इमॅजिका पार्क इमारतीमधील कचरा नळी प्रणालीला दुपारच्या सुमारास लागलेली आग महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने विझवली, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली आहे. या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.आज दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी इमॅजिका पार्क, गट नंबर ४१४, ४१५, व ४२१(P), जाधववाडी, चिखली येथे आग लागल्याची वर्दी महापालिकेच्या अग्निशमन केंद्रास मिळाली. वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या कचरा नळी प्रणाली (garbage chute system) ला आग लागून इमारतीच्या दहाव्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत सर्व कचरा नळी प्रणाली जळाली. त्यामुळे ओपन डक मधुन सर्व मजल्यांना आगीच्या झळा लागल्या, आगीला बघून इमारतीमधील राहणारे रहिवासी घाबरले. सर्व नागरिकांनी इमारती मधून धाव घेऊन तळमजल्यावर येऊन आगीपासून बचाव केला. या आगीमुळे कुठलीही व्यक्ती जखमी झाली नाही. मात्र आगीमुळे इमारतीच्या भिंतीच्या पीओपीला तडे गेले. दहाव्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असे प्रथमदर्शी अग्निशमन दलाकडून निष्पन्न करण्यात आले. इमारतीमध्ये असलेल्या अग्नि सुरक्षितता प्रणाली मधून पाणी घेऊन स्थानिकांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून पूर्णतः आग विझल्याचे तसेच कुठलीही व्यक्ती जखमी नसल्याची खात्री करण्यात आली.चिखली उपअग्निशमन केंद्र येथील १, मोशी उपग्निशमन केंद्र येथील १ तसेच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथील १ अग्निशमन बंब, १ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म ब्रांन्टो वाहन, १ देवदूत अग्निशमन वाहन, तळवडे उपअग्निशमन केंद्र येथील एका अग्निशमन वाहन घटनास्थळी होते. आग नियंत्रणासाठी एकूण ३२ अग्निशमन कर्मचारी वर्गाने कार्य केले.

तारां कित Avatar

Tagged in :

तारां कित Avatar