Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी यशवर्धन मालपाणी यांचे विचारः ध्रुव ग्लोबल स्कूलचा...

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी यशवर्धन मालपाणी यांचे विचारः ध्रुव ग्लोबल स्कूलचा ६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ३४ विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी स्कॉलरशीपचे वितरण

पुणे, दिः १८ जून ः वर्तमानकाळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी करून त्याचा जास्तीत जास्त लाभ उचलावा. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरून अद्यायावत बनावे. त्यासाठी अथक परिश्रम, आत्मविश्वास, शिस्त आणि इतरांचा आदर सन्मान करायला शिकावे, असे विचार मालपाणी ग्रुपचे विश्वस्त व संचालक यशवर्धन मालपाणी यांनी व्यक्त केले. नांदे, पुणे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचा ६व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊतजी उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान आणि संशोधनावर आधारित शिक्षण रूजविण्यासाठी ११वींच्या ३४ विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी ३५ हजार रूपयांची स्कॉलरशीप देण्यात आली.
यशवर्धन मालपाणी म्हणाले, ऑलिंपिक खेळामध्ये देशातील खेळाडूंची संख्या वाढविण्याच्या दिशेने ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांची तयारी करण्यात येईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्याधुनिक शुटिंग रेंजची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच मनोरंजन झोन, गेमिंग झोनची निर्मिती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळण्यासाठी संपूर्ण शाळा वायफाय ने सुसज्जीत असेल.
संगीता राऊतजी म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, शिक्षकांचे अखंड सहकार्य आणि शालेय नेतृत्वाच्या दूरदर्शी मार्गदर्शनामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल ने कमी कालावधीतच शिक्षण क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे.
त्याच प्रमाणे येथे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांमध्ये योगाची प्रात्यक्षिके, संगीत आणि भरतनाट्यम् चे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी रूशिल कौल आणि आर्या मोदी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments