पुणे, ५ जुलैः शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सहाय्यक कुलसचिव अरूण हनुमंतराव शिंदे यांना नुकताच भारतरत्न डॉ. बी.आर.आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४ ने गौरविन्यात आले. त्यांना हा पुरस्कार भारतीय स्वयंसेवी महासंघातर्फे प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह व सन्मान पत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये आयोजित कार्यक्रमात अरूण शिंदे यांना हा पुरस्कार खासदार धैर्यशील मोहिते पाटील, भाऊसाहेब वाकचौर आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदार रामदास आठवले यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय स्वयं सेवी संस्था महासंघाचे अध्यक्ष प्रा. गोरख साठे यांच्या बरोबर शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


