Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedतृतीयपंथीयांनी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर नियुक्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

तृतीयपंथीयांनी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर नियुक्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ११: समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी, पारलिंगी व तृतीयपंथी नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी पारलिंगी तथा तृतीयपंथी व्यक्तींची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक तृतीयपंथीय नागरिकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

ब्रॅण्ड ॲम्बेसेडरच्या नियुक्तीसाठी इच्छुक पारलिंगी, तृतीयपंथी व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, अभिनयाचे व्हिडीओ आणि आवश्यक कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे ६ येथील कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments