Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedकँन्सर रूग्णांनी नवी उमेद, नवे जीवन संदेश देत नववर्षाचे केले स्वागत ...

कँन्सर रूग्णांनी नवी उमेद, नवे जीवन संदेश देत नववर्षाचे केले स्वागत रुग्णांनी केक कापत मानले डाँक्टर आणि रूग्णालयातील स्टाफचे आभार…

तळेगाव – २०२४ या नववर्षाचे सर्वत्र अतिशय दणक्यात स्वागत झाले. या नवीन वर्षात एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रत्येकजण काही तरी नवीन संकल्प आणि ध्येय ठेवून ते पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामध्ये सदृढ आरोग्य, करियर आणि छंद जोपासण्याचे मनाशी ठरवून त्यानुसार नियोजन करतात. अशीच सुरूवात आज टिजीएच-आँन्को लाईफ कँन्सर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या कँन्सर रूग्णांनी नववर्षाचे स्वागत केक कापून करत जगण्याची नवी उमेद, नवी आशा हा संदेश दिला आहे.

पुर्वी कँन्सर या आजाराचे नाव जरी घेतले तरी पायाखालची जमीन सरकायची पण आता उपचारप्रणाली खुपच अद्ययावत झाली असून यामध्ये झालेले नवनवीन संशोधनाने आज कर्करोगावर मात करणे शक्य झाले आहे. तसेच, या आजाराला सामोरे जाताना रूग्णांमध्ये एक सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक असून तो उपचारासाठी फलदायी ठरतो. तसेच, या कँन्सरवर मात करण्याच्या दृष्टीने मानसिक आणि शारिरीकदृष्टया कणखर असल्यास उपचारांनाही चांगला प्रतिसाद मिळतो असे विविध वैद्यकीय अहवालात दिसून आलेले आहे. यावेळी आँन्को लाईफचे तज्ञ डाँक्टर, नर्सेस आणि कर्मचारी वर्ग उपस्थित राहून विविध प्रकारच्या कँन्सर आजारावर उपचार घेत असलेल्या रूग्णांसह नववर्षाचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख म्हणाले की, कँन्सर उपचारात सकारात्मक दृष्टीकोन हा महत्वाचा भाग असून रूग्ण मानसिकदृष्टा खंबीर आणि सकारात्मक असल्यास अर्धा आजार तिथेच बरा होते. आज कॅन्सर उपचारप्रणाली कमालीची अद्ययावत झाली असून नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधे आणि तज्ञ डाँक्टरांच्या सहाय्याने आज कँन्सरसारख्या आजारावर मात करणे शक्य झाले असून आँन्को लाईफ हे सर्व अद्ययावत रेडीएशन, पेटसिटी सारख्या सुविधांनी ग्रामीण भागातील रूग्णांना अगदी शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार देत आहे. तसेच, ही. सेवा अधिकाधिक रूग्णांना देण्यावर आमचा भर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments