Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाई लाईफ सायन्सेस लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

साई लाईफ सायन्सेस लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

साई लाईफ सायन्सेस लिमिटेडने (एसएलएसएल) बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.

 

 

 

साई लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी औषधांचा शोध, विकास आणि उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सेवा पुरवते. त्यांच्या ग्राहकांमध्ये नवीन, छोट्या रासायनिक कंपन्यांपासून जागतिक पातळीवरील फार्मास्युटिकल इनोव्हेटर कंपन्या व बायोटेक्नॉलॉजिकल फर्म्सचा समावेश आहे.

 

 

 

आयपीओमार्फत (प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेले इक्विटी समभाग) भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. या ऑफरमध्ये एकूण ८०० कोटी रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांचा आणि समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून ६,१५,७३,१२० पर्यंत समभागांच्या विक्रीचा समावेश आहे.

 

 

 

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा उपयोग पुढील कारणांसाठी करण्याची साई लाईफ सायन्सेसची योजना आहे – (१) कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड/मुदतपूर्व परतफेड ६०० कोटी रुपयांपर्यंत आणि (२) सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

 

 

 

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments