मुंबई, १५ जुलै २०२४: एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी पडताळणी केलेले एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारले आहेत. कंपनीने विविध महत्त्वाच्या बाबींमध्ये मोठी वाढ दर्शवली असून आर्थिक वर्षासाठी एक सकारात्मक वेग स्थापित केला आहे.
या निकालांबाबत बोलताना एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीमती विभा पडळकर म्हणाल्या की, “आम्ही या वर्षाची सुरूवात उत्तमरित्या केली असून वैयक्तिक एपीआयमध्ये ३१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. याचाच अर्थ असा की, दोन वर्षांचा सीएजीआर २१ टक्के आहे. या उत्तम वाढीला सर्व निकषांवर सर्वसमावेशक कामगिरीमुळे चालना मिळाली आहे.
आम्ही आयआरडीएआयच्या प्रगतीशील बदलांच्या सकारात्मक प्रभावाचे स्वागत करत आहोत. त्यामुळे भारतातील जीवनविम्याची स्थिती मोठ्या प्रमाणावर मजूबत होईल, तो अधिक सुलभ, अधिक पारदर्शक आणि अंतिमतः संभाव्य ग्राहकांसाठी जास्त आकर्षक होईल.”
प्रमुख वैशिष्टे:
· बाजार वाट्याचा विस्तार: खासगी बाजार वाटा क्यू१एफवाय२४ मध्ये १६.४ टक्क्यांवरून क्यू१एफवाय२५ मध्ये १७.१ टक्के वाढला असून वैयक्तिक डब्ल्यूआरपीमधील एकूण बाजारवाटा ११.४ टक्के वाढला आहे
· रिटेल विम्याच्या रकमेत वाढ: बचत उत्पादने आणि मजबूत रायडर अटॅचमेंट यांच्यामुळे जास्त विम्याची रक्कम तसेच रिटेल निर्मितीत २८ टक्के वाढीच्या मदतीमुळे ४६ टक्के वाढ साध्य
· करोत्तर नफा: १५ टक्क्यांची वाढ होऊन ४७८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आणि बॅकबुकमध्ये १८ टक्क्यांची वाढ
· व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एयूएम): २२ टक्के वाढीसह ३ लाख कोटींपेक्षा जास्त टप्पा पार
· भौगोलिक वाढ: टायर १, २ आणि ३ प्रदेशात मोठ्या वाढीची नोंद
· बोनसची घोषणा: ३७२२ कोटी रूपयांचा सर्वाधिक बोनस घोषित, २२ लाखांपेक्षा जास्त पॉलिसीधारक
एचडीएफसी लाइफने पॉलिसीच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली असून तिकीट साइजमध्येही विस्तार झाल्याचे दिसून आले आहे. कंपनीच्या वाढीने वार्षिक आणि दोन वर्षांच्या सीएजीआर तत्त्वावर खासगी क्षेत्रात तसेच एकूण उद्योगाच्या तुलनेत कंपनीची वाढ जास्त झाली आहे. टायर १ बाजारपेठांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे तर टायर २ आणि टायर ३ प्रदेशांमध्ये मोठी वाढ कायम राखली आहे. हा कंपनीच्या उद्योगाचा एक मोठा भाग आहे.
उत्पादनांचे मिश्रण: वैयक्तिक एपीआयवर आधारित राहून यूलिप्समध्ये ३८ टक्के वाढ नोंदवली गेली असून, नॉन पार बचती ३५ टक्के, सहभागी उत्पादने १६ टक्के, कालावधी ६ टक्के आणि वार्षिक बचती ५ टक्के नोंदवण्यात आल्या आहेत. यूलिप मिक्स सुरूवातीला वाढले परंतु तिमाहीदरम्यान इतर श्रेणींमधील उत्पादने आल्यामुळे त्या कमी झाल्या. नॉन पार उत्पादने पुन्हा वाढली आणि ही वाढ वार्षिक स्तरावर ४१ टक्के नोंदवली गेली. नवीन Click२Achieve प्रकारामुळे फक्त १६ दिवसांत नवीन उद्योगात १०० कोटी रूपयांची नोंद झाली.
नवीन उद्योगाचे मूल्य (व्हीएनबी): पहिल्या तिमाहीतील व्हीएनबी ७१८ कोटी रूपये होते. त्यामुळे वार्षिक आणि दोन वर्षांच्या सीएजीआर तत्त्वावर १८ टक्क्यांची सुदृढ वाढ नोंदवली गेली आहे.
भारतभरात आर्थिक संरक्षणात मोठ्या दरीमुळे विमा क्षेत्राला वाढीच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. एचडीएफसी लाइफ नावीन्यपूर्ण विमा उपाययोजनांद्वारे भारताचे भवितव्य सुरक्षित करण्याबाबत वचनबद्ध आहे.


