Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून...

आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंग आणि वारकरी माऊलींना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन; भाविकांना शुभेच्छा*

 

 

 *राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे,*

 *शेतकऱ्यांच्या घरात धनधान्याची सुबत्ता येऊदे*

 *मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे*

 *समाजात एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे*

 *महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे*

– *–उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पांडुरंगाच्या चरणी साकडं*

 

 

*महाराष्ट्र समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची*

*पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे*

*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा*

 

*राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे*

*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बा पांडुरंगास साकडं*

 

*सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून*

*महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्याची ताकद आम्हाला दे*

*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडं*

 

मुंबई, दि. 16 :- बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचलेल्या वारकरी माऊलींच्या तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केलं असून “राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊदे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊदे, समाजातली एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहूदे, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असं साकडंही त्यांनी बा पांडुरंगाला घातलं.

 

आषाढी एकादशीनिमित्तानं जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची आध्यात्मिक, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या वारकरी माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला एकता, समता, बंधुतेचा विचार देणारी, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे.

—-००००—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments