Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सकडून भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन केंद्राचे उद्घाटन

पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सकडून भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन केंद्राचे उद्घाटन

१७ जुलै २०२४ – पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स कॉर्पोरेशन (पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स) या जगातील इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्‍ड कनेक्‍टीव्‍हीटी (आयएफईसी) सोल्‍यूशन्‍सच्‍या आघाडीच्‍या कंपनीने आज भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्राचे उद्घाटन केले आहे. १९७९ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स सर्वसमावेशक अनुभव देते, जे एअरलाइन्‍सना त्‍यांच्‍या प्रवाशांशी कनेक्‍ट करत इन-फ्लाइट अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत आणि नवीन युगातील विमान प्रवासासाठी इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्‍ड कम्‍युनिकेशन (आयएफईसी) सिस्‍टम्‍सच्‍या मूल्‍याला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत. जगातील २०० हून अधिक आघाडीच्‍या एअरलाइन्‍सनी त्‍यांच्‍या एअरक्राफ्टमध्‍ये पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सचे इन-फ्लाइट एंगेजमेंट, सॅटेलाइट वाय-फाय कनेक्‍टीव्‍हीटी आणि डिजिटल सेवा इन्‍स्‍टॉल करण्‍याचे ठरवले आहे.

 

प्रमुख अतिथी म्‍हणून माननीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्‍यमंत्री श्री. मुरलीधर मोहोल यांच्‍या उपस्थितीत पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सच्‍या पुण्‍यातील नवीन केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले. पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स कॉर्पोरेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. केन सैन आणि पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया व साऊथ एशियाचे अध्‍यक्ष, तसेच पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स इंडियाचे संचालक श्री. मनिष शर्मा यांनी उद्घाटन समारोहामध्‍ये त्‍यांचे स्‍वागत केले.

 

पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स कॉर्पोरेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. केन सैन म्‍हणाले, ”पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स विकसित करणाऱ्या प्रत्‍येक आयएफईसी सोल्‍यूशनमध्‍ये नाविन्‍यपूर्ण, भविष्‍य-केंद्रित व प्रमाणित सॉफ्टवेअरला प्राधान्‍य देते, तसेच डिजिटल चॅनेलची निर्मिती करते, जे आमच्‍या एअरलाइन ग्राहकांना अधिक कार्यक्षमपणे त्‍यांच्‍या प्रवाशांशी संलग्‍न होण्‍यास सक्षम करते.”

 

”सर्वाधिक कुशल इंजीनिअर्स आणि झपाट्याने विकसित होत असलेल्‍या एव्हिएशन क्षेत्रासह भारत आमच्‍या व्‍यवसायाच्‍या भवितव्‍यासाठी गुंतवणूक करण्‍याकरिता उत्तम लोकेशन आहे आणि आम्‍ही पुण्‍यातील आमच्‍या नवीन केंद्राच्‍या माध्‍यमातून सॉफ्टवेअर इनोव्‍हेशन व डिझाइन क्षमता वाढवण्‍यास उत्‍सुक आहोत.”

 

पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स कॉर्पोरेशनचे चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर सत्‍येन यादव म्‍हणाले, ”आजचा दिवस महत्त्वाचा टप्‍पा आहे, जेथे आम्‍ही एअरलाइन प्रवाशांना वैयक्तिकृत डिजिटल अनुभव देण्‍याच्‍या दिशेने प्रवास सुरू करत आहोत. आम्‍ही अत्‍याधुनिक सॉफ्टवेअर सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यास उत्‍सुक आहोत, जे प्रांतातील व जागतिक स्‍तरावरील ग्राहकांना, तसेच पुण्‍यातील आमच्‍या वाढत्‍या सॉफ्टवेअर टॅलेंटला आनंदित करतील.”

 

पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया व साऊथ एशियाचे अध्‍यक्ष आणि पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स इंडियाचे संचालक मनिष शर्मा म्‍हणाले, ”भारत ‘सॉफ्टवेअर टॅलेंटसंदर्भात क्षमतां’शी संलग्‍न आहे. आज, भारत संपूर्ण जगाला आयटी सपोर्ट व आयटी सेवा देत आहे आणि पॅनासोनिकने जगभरातील इतर उपकंपन्‍यांना उच्‍च दर्जाच्‍या सेवा देण्‍यासाठी इनोव्‍हेशन केंद्रे व जागतिक क्षमता केंद्रे स्‍‍थापित करण्‍यामध्‍ये गुंतवणूक केली आहे. पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सचे पुण्‍यातील केंद्र भारतातील आमच्‍या गुंतवणूकांच्‍या सिरीजमधील नवी

न केंद्र

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments