Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedहेन्‍केल तर्फे भारतातील आपल्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादन केंद्रामध्‍ये अधिक गुंतवणूक

हेन्‍केल तर्फे भारतातील आपल्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादन केंद्रामध्‍ये अधिक गुंतवणूक

हेन्‍केल अ‍ॅधेसिव्‍ह्ज टेक्‍नॉलॉजीज इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (हेन्‍केल इंडिया) ने पुण्‍याजवळील कुरकुंभ येथील त्‍यांच्‍या उत्‍पादन केंद्राच्‍या तिसऱ्या टप्‍प्‍याचे बांधकाम पूर्ण झाल्याची घोषणा केली. २०२० मध्‍ये लाँच करण्‍यात आलेली कुरकुंभ साइट भारतातील उद्योगांच्‍या अ‍ॅधेसिव्‍ह्ज , सीलण्‍ट्स आणि सरफेस ट्रीटमेट उत्‍पादनांमधील उच्‍च-कार्यक्षम सोल्‍यूशन्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करते. हेन्‍केलचा प्रख्‍यात ब्रँड लोक्‍टाइटवरून नाव देण्‍यात आलेल्‍या नवीन लोक्‍टाइट प्‍लाण्‍टचे उद्घाटन हेन्‍केल अ‍ॅधेसिव्‍ह् टेक्‍नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्‍यक्ष मार्क डॉर्न यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी कंपनीचे इतर वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापन सदस्‍य देखील उपस्थित होते.

 

हेन्‍केल अ‍ॅधेसिव्‍ह् टेक्‍नॉलॉजीजने १९९६ मध्‍ये भारतातील बाजारपेठेत प्रवेश केला आणि आज या व्‍यवसायासाठी मोठी विकास स्रोत आहे. हेन्‍केल झपाट्याने होणाऱ्या विकासाची पूर्तता करण्‍यासाठी सातत्‍यपूर्ण धोरणात्‍मक गुंतवणूक करत देशातील आपली उपस्थिती वाढवत आहे. आज, कंपनीची भारतात दृढ उपस्थिती आहे आणि पाच उत्‍पादन साइट्स, दोन इनोव्‍हेशन सेंटर्स, कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍स सेंटर, पॅकेजिंग अकॅडमी आणि फूटवेअर उद्योगासाठी अ‍ॅप्‍लीकेशन सेंटर यांचे कार्यसंचालन पाहते.

 

कुरकुंभ उत्‍पादन साइटमधील नवीन लोक्‍टाइट प्‍लाण्‍टमधून भारतातील बाजारपेठेत विकासाला गती देण्‍याचा हेन्‍केलचा दृष्टीकोन दिसून येतो. हे प्‍लाण्‍ट भारतातील व्‍यवसायांना सेवा देईल, उत्‍पादन पोर्टफोलिओचे अधिक स्‍थानिकीकरण करेल, ज्‍यामुळे आयातींवरील अवलंबन कमी होईल. तसेच, हे प्‍लाण्‍ट उत्‍पादन, मेन्‍टेनन्‍स, रिपेअर अ‍ॅण्‍ड ओव्‍हरहॉल (एमआरओ) आणि ऑटोमोटिव्‍ह कम्‍पोनण्‍ट्स क्षेत्रांसाठी उच्‍च-कार्यक्षम अ‍ॅधेसिव्‍ह् सोल्‍यूशन्‍सची पुरवठा-मागणी तफावत दूर करण्‍यामध्‍ये देखील मदत करेल. हेन्‍केल अ‍ॅधेसिव्‍ह् टेक्‍नॉलॉजीज या झपाट्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठ क्षेत्रांमधील वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे.

 

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत हेन्‍केल अ‍ॅधेसिव्‍ह् टेक्‍नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्‍यक्ष मार्क डॉर्न म्हणाले, “जागतिक स्‍तरावर भारत हेन्‍केलसाठी केंद्रित बाजारपेठ म्‍हणून उदयास आले आहे. नवीन लोक्‍टाइट प्‍लाण्‍टमधून देशामध्‍ये प्रबळ स्‍थानि‍क उपस्थितीसह स्‍वावलंबी जागतिक बाजारपेठ कंपनी म्‍हणून उदयास येण्‍याचा आमचा दृष्टीकोन दिसून येतो. सातत्‍यपूर्ण गुंतवणूका, कार्यक्षम पुरवठा साखळ्या आणि ग्राहक-केंद्रित सोल्‍यूशन्‍ससह हेन्‍केल भारतात विकासाला गती देण्‍याप्रती आणि सहयोगी व ग्राहकांसोबत सहयोगाने नाविन्‍यपूर्ण व शाश्‍वत सोल्‍यूशन्‍सच्‍या इकोसिस्‍टम्‍स निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.”

 

कुरकुंभ साइटमधून देखील हेन्‍केलची जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्‍हणून स्‍थानिक समुदायाप्रती समर्पितता दिसून येते. ही साइट शाश्‍वततेच्‍या उच्‍च मानकांची पूर्तता करते आणि लीड गोल्‍ड प्रमाणित आहे, जे केमिकल प्‍लाण्टसमधील दुर्मिळ वैशिष्‍ट्य आहे. तसेच, हेन्‍केलचा २०३० पर्यंत स्‍कोप १ व २ उत्‍सर्जनांसाठी कुरकुंभमध्‍ये कार्बन-न्‍यूट्रलिटी संपादित करण्‍याचा मनसुबा आहे. या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्‍यासाठी साइटने हरित इलेक्ट्रिकल ऊर्जा पॉवर परचेस अॅग्रीमेंटवर स्‍वाक्षरी केली आहे आणि ऑन-साइट सोलार पॅनेल्‍स बसवले आहेत.

 

हेन्‍केल इंडियाचे कंट्री प्रेसिडण्‍ट एस. सुनिल कुमार म्‍हणाले, ”आमच्‍या उत्‍पादन फूटप्रिंटच्‍या विस्‍तारीकरणामधून भारताला प्रगत व उच्‍च-कार्यक्षम अ‍ॅधेसिव्‍ह्, सीलण्‍ट व कार्यक्षम कोटिंग सोल्‍यूशन्‍ससाठी उत्‍पादन केंद्र बनवण्‍यासाठी हेन्‍केलची शाश्‍वत कटिबद्धता दिसून येते. नवीन लोक्‍टाइट प्‍लाण्‍टचे प्रमुख आकर्षण आहे ऑटोमेटेड स्‍टोरेज अ‍ॅण्‍ड रिट्रायव्‍हल सिस्‍टम (एएसआरएस), जी मटेरिअरल स्‍टोरेज व रिट्रायव्‍हलची जलद अंमलबजावणी करते. प्‍लाण्‍ट इंडस्‍ट्री ४.० चा फायदा घेईल, उत्‍पादन कार्यक्षमता सानुकूल करेल आणि हेन्‍केल इंडियासाठी लाभक्षमता, ऑर्गनिक विकासाला अधिक गती देईल, तसेच भारत सरकारच्‍या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाप्रती योगदान देत राहिल.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments