Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized- शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूकांमुळे निवड प्रक्रियेत आणि समितीच्या कार्यकाळात येणार सुसूत्रता..

– शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूकांमुळे निवड प्रक्रियेत आणि समितीच्या कार्यकाळात येणार सुसूत्रता..

आतापर्यंत ६० महापालिका शाळांमध्ये निवडणूक संपन्न

पिंपरी, दि. १९ जुलै २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सर्व महापालिका शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणूकांची प्रक्रिया १५ जून २०२४ रोजी सुरू झाली असून ३१ जुलै पर्यंत चालणार आहे. या समितीच्या कार्यकाळात आणि निवड प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत ६० महापालिका शाळांमध्ये निवडणूका संपन्न झाल्या आहेत.

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९ नुसार प्रत्येक शाळेने शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ७५% टक्के पालकांचा तर उर्वरित २५% मुख्याध्यापक, महापालिका सदस्य, शिक्षक आणि शिक्षण किंवा बाल विकास तज्ञ यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, समिती सदस्यांपैकी किमान ५०% महिला असणे आवश्यक असून समितीचे अध्यक्ष पालकांमधूनच निवडले जाणार आहेत.

कोट – पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती महत्वाची

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळेल असे सर्वसमावेशक वातावरण निर्माण करणे हे महापालिकेचे ध्येय आहे. प्रथमच या निवडणूका औपचारिकपणे आणि सुयोग्य कार्यप्रणालीद्वारे आयोजित केल्या जात आहेत.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट – शाळा व्यवस्थापन समितीमुळे संरचित आणि एकसंध दृष्टीकोण निर्माण होण्यास मदत मिळणार

शाळांमध्ये पारदर्शकता आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे आणि यासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती निवडणुकांमुळे शाळा व्यवस्थापनात एक संरचित आणि एकसंध दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत मिळेल ज्यामुळे शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढेल.

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

बॉक्स

शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य –

शालेय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी सहकार्य करणे.

शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.

शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.

शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणा-या अडचणीचे निरसन करून शाळेचा विकास करणे.

शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

शाळा स्तरावर येणाऱ्या अडचणींवर समिती सदस्यांनी एकत्रित येऊन काम करणे.

शाळा व्यवस्थापन समिती शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल, महिला पालक, विशेष मुले आणि मुलींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करेल आणि विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितता सुनिश्चित करेल.

बॉक्स

महापालिकेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीसाठी उपक्रम –

निधीची तरतूद:

१५० विद्यार्थी संख्या – ६० हजार रुपये

१५१ ते ५०० विद्यार्थी संख्या – ८० हजार रुपये

५०० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या – १ लाख रुपये

– २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून, महापालिका नव्याने निवडून आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीस निधी उपलब्ध करून देईल.

२. निधीचा उद्देश:

– शिक्षण व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करणे.

– पालक आणि शाळांना स्वायत्तता प्रदान करणे.

– शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणे.

– विशिष्ट शालेय स्तरावरील गरजा आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी.

३. निधी वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे:

– शैक्षणिक सुधारणा करणे.

– अध्यापन-शिक्षण पद्धतीवर भर देणे.

– पालक आणि समुदाय प्रतिबद्धता.

– पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करणे.

– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे.

4. निधी वाटप:

– प्रत्येक शाळेतील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निधीचे वाटप केले जाणार.

बॉक्स

शाळा व्यवस्थापन समिती निवडणूकांमधील महत्वाचे मुद्दे –

निवडणूकीचा कार्यकाळ – १५ जून ते ३१ जुलै

शाळा व्यवस्थापन समितीची रचना – ७५% पालक, २५% शालेय कर्मचारी आणि तज्ञ तसेच समितीमध्ये ५०% महिला

फायदे – निवड प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळाची एकाचवेळी सुरुवात सुनिश्चित करण्यासाठी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती सुधारणे तसेच आरोग्य

, सुरक्षितता आणि समुदाय सहभागही वाढविणे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments