Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे दीक्षारंभ 2024 चे आयोजन

सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे दीक्षारंभ 2024 चे आयोजन

कुशल मुनष्यबळासाठी जगाचे भारताकडे लक्ष : चंद्रकांत पाटील

 

· पुढील 25 वर्षात जागतिक मनुष्यबळातील प्रत्येक चौथा व्यक्ती हा भारतीय असेल : वेद मणी तिवारी

 

· ज्ञान,कौशल्ये,संस्कृती आणि वृत्तीने स्वत:ला घडवा : मेधा कुलकर्णी

 

· कौशल्य आणि ज्ञान यांचे एकत्रित महत्त्व : डॉ.एस.बी.मुजूमदार

 

 

 

पुणे,20 जुलै 2024 : सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे 2024-25 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ 2024 हा इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी,नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (एनएसडीसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी (दृकश्राव्य माध्यमातून), सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.एस.बी.मुजूमदार, प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार आणि कुलगुरू डॉ.राजेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

राज्याने जर्मनीबरोबर केलेल्या सामंजस्य कराराची माहिती देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, कुशल मनुष्यबळासाठी जगाचे भारताकडे लक्ष आहे व त्यामुळे कौशल्य विद्यापीठांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कुशल व्यावसायिक निर्माण करण्यासाठी सिंबायोसिस सारखे विद्यापीठ हे महत्त्वाचे कार्य करत आहे. तरूणांना विविध कौशल्यांनी सक्षम करण्यावर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भर आहे,ज्यामुळे तरूणांना करिअरमध्ये विविध पर्याय उपलब्ध होतील.

 

 

 

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही एक नवी सुरूवात असून आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तरूणांनी आपली आवड,त्या क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन करिअर मधील पर्याय निवडावे.

 

 

 

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (एनएसडीसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक वेद मणी तिवारी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना म्हणाले की, देशाच्या विकासामध्ये कौशल्याची महत्त्वाची भूमिका आहे. भारत हा तरूणांचा देश आहे. पुढील 25 वर्षात जगात 100 कोटी नवीन मनुष्यबळ कार्यरत होईल आणि त्यामध्ये प्रत्येक चौथा व्यक्ती हा भारतीय असेल. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट कंपन्या या कुशल तरूणांच्या शोधात आहेत.

 

 

 

सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.एस.बी.मुजूमदार म्हणाले की, इंडक्शन डे हा विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हे त्यांचे पहिले पाऊल असते. हे विद्यापीठ पदवीबरोबरच कौशल्य देखील प्रदान करते. आजच्या काळात ज्ञान आणि कौशल्य यांचे समान महत्त्व आहे.

 

 

 

सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार म्हणाल्या की,सिंबायोसिस ने सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस हे भारतातील पहिले कौशल्य आधारित विद्यापीठ इंदौर येथे स्थापन केले असून पुण्यातील किवळे कॅम्पस हे दुसरे आहे.गेल्या 6 ते 7 वर्षात हजारो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात कौशल्य आत्मसात करून आपल्या करिअरचा प्रवास यशस्वीरित्या सुरू केला आहे. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की,2000 हून अधिक विद्यार्थी हे पूर्ण वेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात,तर 3000 हून अधिक विद्यार्थी शॉर्ट टर्म कोर्सेस द्वारे शिकत आहेत.25 टक्के हून अधिक विद्यार्थी हे नवउद्योजक बनत असून त्यांच्या उद्योजकतेचा प्रवास कॅम्पसमधील अटल इनक्युबेशन सारख्या उत्कृष्ट सुविधांपासून सुरू होतो.70 टक्के हून अधिक शिक्षण व्यावहारिक (प्रॅक्टीकल) पध्दतीने आणि उद्योगांच्या गरजांशी सुसंगत आहे.विविध उद्योगांशी 500 हून अधिक सामंजस्य करार असून 17 हून अधिक विदेशी विद्यापीठांशी सहयोग आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होते.

 

 

 

कुलगुरू डॉ.राजे

श इंगळे यांनी आभार व्यक्त केले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments