Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे जिल्ह्यात अवकाश उड्डाणावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात अवकाश उड्डाणावर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

 

पुणे, दि. २४: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २८ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २९ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

 

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments