Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorized*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन*

*पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २४ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत असून भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते.

 

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करुन घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार रूपये, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रूपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ हजार रूपये इतकी रक्कम लाभाच्या स्वरुपात वितरीत केली जाणार आहे.

 

पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावा, असे अवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संगिता डावखर यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्व्हे नं.१०४/१०५ येरवडा पोलीस स्टेशन सगोर विश्रांतवाडी पुणे- ६ येथे संपर्क करावा. तसेच या योजनेअंतर्गतचे अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments