Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल, पुणे येथे जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त तणाव व्यवस्थापनावर केंद्रित मार्गदर्शन कार्यक्रम

केईएम हॉस्पिटल, पुणे येथे जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त तणाव व्यवस्थापनावर केंद्रित मार्गदर्शन कार्यक्रम

पुणे २५ जुलै 2024: केईएम हॉस्पिटल, पुणे तर्फे जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त तणाव व्यवस्थापनावर केंद्रित मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.आयव्हीएफ द्वारे यशस्वीपणे गर्भधारणा झालेल्या आणि आयव्हीएफ उपचार चालू असणाऱ्या सुमारे 50 व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. केईएम हॉस्पिटल, पुणे येथील वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ डॉ.मीनल अग्रवाल आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ.उज्ज्वल नेने यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व आणि विविध तणाव व्यवस्थापन तंत्रांविषयी माहिती देण्यात आली. केईएम हॉस्पिटल, पुणे येथील फिटल मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद कऱ्हाडे, आयव्हीएफ/एआरटी विभागाच्या प्रमुख व प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. मुग्धा पारसनीस आणि इतर तज्ञांनीही यावेळी मार्गदर्शन केले.आयव्हीएफ द्वारे गर्भधारणा झालेल्या जोडप्यांनी त्यांचे अनुभव सांगितले.

 

आयव्हीएफ उपचार सुरु करताना व त्याच बरोबर दैनंदिन काम चालू ठेवताना, उपचार यशस्वी होतील की नाही याबद्दल आणि इतर समस्यांबद्दल जोडप्यांना स्वाभाविकपणे खूप चिंता आणि तणाव असतो. त्यामुळे स्वत:ची योग्य काळजी घेणे, निरोगी जीवनशैली आणि तणावाचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. वय,अनुवंशिकता , मूळ कारणे, जीवनशैलीचे घटक इत्यादी इतर अनेक घटकांसह तणाव आयव्हीएफ उपचारांच्या यशावर परिणाम करू शकतात. उपचारा दरम्यानच्या काळात तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments