दि. २५ जुलै
पुणे.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट, पुणेतर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा २०२३ मध्ये यशस्वितांचा १४वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळा शुक्रवार , दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) माजी अध्यक्ष डी.पी अग्रवाल आणि लोकसत्ता पार्टीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी डॉ. जयप्रकाश नारायण हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे ही उपस्थित राहतील.
भारतातून द्वितीय आलेले अनिमेष प्रधान यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ७५ हजार रूपयांचे पारितोषिक तसेच शाल व श्रीफळ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर १६० यशस्वीतांचा सत्कार होणार आहे.


