Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग इंडियाकडून चिल्‍ड वॉटर-बेस्‍ड कॅसेट युनिट्समध्‍ये विंडफ्री आणि ३६०० ब्‍लेडलेस टेक्‍नॉलॉजी असलेल्‍या...

सॅमसंग इंडियाकडून चिल्‍ड वॉटर-बेस्‍ड कॅसेट युनिट्समध्‍ये विंडफ्री आणि ३६०० ब्‍लेडलेस टेक्‍नॉलॉजी असलेल्‍या एसींची नवीन श्रेणी लाँच

राष्‍ट्रीय – जुलै २३, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्‍यांचे नवीन इनोव्‍हेशन – चिल्‍ड वॉटर इनडोअर श्रेणीमधील नवीन विंडफ्री एअर कंडिशनर्सच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या नवीन श्रेणीमध्‍ये चिल्‍ड वॉटर-बेस्‍ड कॅसेट युनिट्समधील विंड-फ्री आणि ३६०० ब्‍लेडलेस टेक्‍नॉलॉजी आहे, जे वापरकर्त्‍यांना प्रत्‍यक्ष अधिक प्रमाणात थंडावा न देता उच्‍च दर्जाचा कूलिंग अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

 

चिल्‍ड वॉटर-बेस्‍ड कॅसेट युनिट्स वापरकर्त्‍यांना इच्छित तापमान सेट करण्‍याची सुविधा देते आणि विंड-फ्री कूलिंग तंत्रज्ञान ०.१५ मीटर/सेकंद विंड गतीमध्‍ये जवळपास १५,००० मायक्रो-एअर होल्‍सच्‍या माध्‍यमातून थंड हवा प्रसारित करते. तसेच, प्रगत एअरफ्लो सिस्‍टम जलदपणे खोलीमध्‍ये थंडावा निर्माण करते, फक्‍त २४ डेसिबल (ए) आवाज करत शांतपणे कार्य करते. ज्‍यामुळे एसींची ही श्रेणी बेडरूम्‍स, स्‍टडी रूम्‍स व बेबी रूम्‍ससाठी अनुकूल आहे.

 

नवीन फॅन कॉईल युनिट विंड-फ्री एसी पाण्‍याचे पाइप्‍स आणि संबंधित व्‍हॉल्‍व्‍ह्जचा वापर करत सेंट्रल चिल्‍ड वॉटर सिस्‍टमला कनेक्‍ट करण्‍यात आले आहे. हे हायड्रॉनिक फॅन कॉईल युनिट्स मोठ्या जागांमध्‍ये उष्‍णता किंवा थंडावा निर्माण करण्‍यासाठी गरम किंवा थंड पाणी प्रसारित करतात. हे युनिट्स सॅमसंग एअर-कूल्‍ड चिलर्स किंवा कोणत्‍याही थर्ड-पार्टी एअर-कूल्‍ड आणि वॉटर-कूल्‍ड चिलर्ससोबत वापरता येऊ शकतात.

 

”सॅमसंगमध्‍ये आमचा अंतिम वापरकर्त्‍यांना आमच्‍या अत्‍याधुनिक उत्‍पादन ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून सोयीसुविधा व टिकाऊपणा देण्‍याचा मनसुबा आहे. चिल्ड वॉटर फॅन कॉईल युनिट्स शांतपणे कार्य करत जलद गतीने उच्‍च दर्जाचे कूलिंग देतात. कूलिंग युनिट्स मोठ्या जागांसाठी अधिक अनुकूल आहेत आणि आमचा एअरफ्लो सिस्‍टम्‍सना अधिक प्रगत, उत्‍साहवर्धक आणि उपलब्‍ध होण्‍याजोगे करण्‍याचा प्रयत्‍न आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एसएसी बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक विपीन अग्रवाल म्‍हणाले.

 

सॅमसंग चिल्‍ड वॉटर फॅन कॉईल युनिट्स तीन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत –

 

· १ वे कॅसेट (२.६ केडब्‍ल्‍यू ते ४.२ केडब्‍ल्‍यू): मोठ्या जागांना जलदपणे व कार्यक्षमपणे थंड करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या या युनिटमध्‍ये ऑटो स्विंग वैशिष्‍ट्य आहे. यामधील मोठे ब्‍लेड अधिक लांब व मोठ्या जागेमध्‍ये थंड हवा प्रसारित करते, तर ऑटो स्विंग प्रत्‍येक कानाकोपऱ्यामध्‍ये थंड हवा प्रसारित करते. १वे कॅसेट्सची डिझाइन अत्‍यंत स्लिम व आकर्षक आहे. या युनिटची उंची १३५ मिमी आहे आणि फक्‍त १५५ मिमी जागा असलेल्‍या लहान सिलिंगमध्‍ये सहजपणे फिट बसू शकते. म्‍हणून, ते जागा मर्यादित असलेल्‍या ठिकाणी थंडावा किंवा उष्‍णता निर्माण करण्‍यासाठी अनुकूल व प्रभावी सोल्‍यूशन देते. तसेच, त्‍याची आकर्षक व सुसंगत डिझाइन सर्व प्रकारच्‍या आणि स्‍टाइल्‍सच्‍या इंटीरिअर्समध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करते.

 

 

 

· ४ वे कॅसेट (६.० केडब्‍ल्‍यू ते १०.० केडब्‍ल्‍यू): हे युनिट मोठ्या ब्‍लेड डिझाइनच्‍या माध्‍यमातून उच्‍च दर्जाची कूलिंग कार्यक्षमता देते, जे निवडण्‍यात आलेल्‍या जागांपर्यंत थंड हवा अचूकपणे प्रसारित करते आणि इतरत्र प्रसारण्‍याला प्रतिबंध करते.

 

 

 

· ३६०० चिल्‍ड वॉटर कॅसेट (६.० केडब्‍ल्‍यू ते १०.० केडब्‍ल्‍यू): या युनिटमध्‍ये नाविन्‍यपूर्ण चक्रिय डिझाइन आहे, जी आधुनिक आर्किटेक्‍चरल इंटीरिअर्समध्‍ये आकर्षकतेची भर करते आणि अधिक थंडावा निर्माण न करता कानाकोपऱ्यामध्‍ये एकसमान थंड हवा प्रसारित करते. एअरफ्लोला प्रतिबंध करण्‍यासाठी कोणतेच ब्‍लेड्स नसलेले हे युनिट जवळपास २५ टक्‍के अधिक थंड हवा बाहेर टाकून दूरवर प्रसारित करते.

 

किंमत आणि उपलब्‍धता

 

सॅमसंग चिल्‍ड वॉटर फॅन कॉईल युनिट्सचे ३ व्‍हेरिएण्‍ट्स भारतभरातील सॅमसंगच्‍या नोंदणीकृती ऑफलाइन सहयोगींच्‍या नेटवर्कमध्‍ये उपलब्‍ध आहेत, जेथे सर्वात लहान क्षमता असलेल्‍या युनिटची किंमत ३५,००० रूपयांपासून सुरू होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments