Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर*

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर*

 

 

पुणे, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले असून आता सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली आहे.

 

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. निवडणूक आयोगाने २० जून २०२४ च्या पत्रान्वये १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

 

भारत निवडणूक आयोगाने २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी २ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दावे व हरकती २ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सादर करता येतील. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २६ ऑगस्ट पर्यंत दाखल दावे व हरकती निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २७ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे.

 

पुणे जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे पुणे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments