Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिद्धार्थ दादा' बॅनरवर आमचा फोटो टाका शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भगिनींची आमदार...

सिद्धार्थ दादा’ बॅनरवर आमचा फोटो टाका शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भगिनींची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना साथ

पुणे : दादा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर आमचा फोटो टाका ना – आपली लाडकी बहीण, अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भगिनींनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना साथ दिली. मतदार संघातील महिलांचा आमच्यावरील विश्वास हा भारावून टाकणारा आहे, अशी भावना शिरोळे यांनी व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहिती देणारे काही फलक शिवाजीनगर मतदारसंघात लावल्यानंतर त्यातील महिलांचे छायाचित्र वापरण्यावर काहींनी आक्षेप घेतले होते. त्यांच्या भावनांचा विचार करून शिरोळे यांनी ते फलक हटवले. हे वृत्त समजताच मतदारसंघातील अनेक भगिनींनी शिरोळे यांची भेट घेतली.

 

या योजनेच्या प्रसारासाठी आमची छायाचित्रे वापरा, परंतु प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोचलीच पाहीजे, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. गरजू महिलांसाठी मोलाची ठरणारी ही योजना पोचवण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

 

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद असून ही योजना प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोचवा, अशी आग्रही मागणी माझ्या मतदारसंघातील भगिनी करताहेत. या योजनेवर त्या दाखवित असलेला विश्वास भारावून टाकणारा आहे, असेही त्यांनी सांगि

तले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments