Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोन इंडियातर्फे भारतात या क्षेत्रातील पहिली '100 किमी टायर सर्व्हिस' सुरू ...

ब्रिजस्टोन इंडियातर्फे भारतात या क्षेत्रातील पहिली ‘100 किमी टायर सर्व्हिस’ सुरू             ही ऑफर केवळ टुरांझा 6i टायरसाठी लागू

 

 

योग्य फिटमेंट, कंप (व्हायब्रेशन) कमी करणे आणि टायरचा परफॉरमन्स अधिक चांगला करणे

हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर मर्यादित डीलर्ससह 1 ऑगस्ट 2024 पासून पुण्यात सुरू होईल.

 

पुणे, (2 ऑगस्ट, 2024) : ब्रिजस्टोन इंडियातर्फे आज त्याच्या टुरांझा 6i टायर्ससाठी कॉम्पिलमेंटरी (निःशुल्क) टायर रिफिलिंग (हवा भरणे) आणि देखभाल सेवा सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. भारतीय टायर क्षेत्रात ही अशा प्रकारची पहिलीची सेवा आहे आणि भारतीय ग्राहकांना उत्तम उत्पादन अनुभव प्रदान करण्यासाठीची ब्रिजस्टोनची प्रतिबद्धता यातून दिसून येते. ब्रिजस्टोनतर्फे सध्या जपानमध्ये ही समस्या उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि आता हा खास अनुभव भारतात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपल्या टायर्सच्या माध्यमातून उत्कृष्ट अनुभवनिर्मिती करण्यात असलेले कौशल्य यातून अधोरेखित होते.

 

ब्रिजस्टोन टुरांझा 6i टायर बसवल्यानंतर ग्राहकांना 100 किमी चेक-अप ही निःशुल्क सर्व्हिस देण्यात येते. टुरांझा 6i टायरचा इष्टतम परफॉरमन्स, टिकाऊपणा आणि प्रीमिअम कम्फर्ट राइड अनुभव यांची खातरजमा करण्याच्या दृष्टीने या सेवेची रचना करण्यात आली आहे.

 

ही सेवा मर्यादित डिलर्ससह 1 ऑगस्ट 2024 पासून पुण्यात सुरू करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इतर डीलर्स व बाजारपेठांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येईल. ग्राहकांना ही नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डीलर्स पूर्णपणे सज्ज असल्याची खातरजमा करण्यासाठी ब्रिजस्टोन या डीलर्सना इक्विपमेंट अपग्रेडही (उपकरणे अद्ययावत करणे) देणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टेक्स्ट मेसेजच्या (लिखित संदेश) माध्यमातून आठवण करून देण्यात येईल.

 

“आमच्या ग्राहकांना वाहन चालविण्याचा उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि आमच्या टुरांझा 6i च्या ग्राहकांसाठी या निःशुल्क 100किमी चेक-अप सर्व्हिसचा आरंभ हे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. ही या क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच सेवा आहे आणि ग्राहकांचे समाधान व टायरचा परफॉरमन्स यात अत्युच्च पातळी सादर करण्यासाठी असलेल्या आमच्या प्रतिबद्धतेची यातून पुन्हा एकदा प्रचिती येते. या सर्व्हिसमुळे वाहन चालविण्याचा एकूण अनुभव अधिक वृद्धिंगत होईलच, त्याचप्रमाणे टायरचे आयुर्मान वाढेल आणि ग्राहकांसाठी ते टायर अधिक उपयुक्त ठरतील. पुण्यात सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमाला घवघवीत यश लाभेल, याची मला खात्री आहे. टप्प्याटप्प्याने इतर बाजारपेठांमध्येही आम्ही या उपक्रम सुरू करणार आहोत.”, असे ब्रिजस्टोन इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर श्री. राजश्री मोइत्रा म्हणाले.

 

सुयोग्य टायर फिटमेंट, अलाइनमेंट, बॅलेन्सिंग आणि कंप (व्हायब्रेशन) कमी करण्याच्या दृष्टीने या नवीन 100 किमी चेक-अप सर्व्हिसची रचना करण्यात आली आहे. टायर बसविल्यानंतर पहिल्या 100 किमीनंतर टायर सेटल झाल्यावर हवेच्या दाबाची पुनर्तपासणी, टॉर्क ॲडजस्टमेंट आणि एकूणच टायरचा परफॉरमन्स उंचावणे याचा यात समावेश आहे. जागतिक पातळीवर असलेल्या उत्तम कार्यपद्धती राबवून ग्राहकांना समाधान देण्यासाठी आणि टायर दीर्घकाळ टिकण्यासाठी असलेली ब्रिजस्टोनची प्रतिबद्धता यातून दिसून येते

ब्रिजस्टोनने जपानमध्ये अशाच प्रकारच्या सेवांमध्ये मापदंड निश्चित केले आहेत आणि आता हां प्रगत ग्राहक सेवा उपक्रम ते भारतात आणत आहेत. भारतीय ग्राहकांच्या बदलणाऱ्या मागण्यांची पूर्तता करण्याशी आणि मार्केट लीडर म्हणून ब्रिजस्टोनचे असलेले स्थान राखण्याशी हा उपक्रम सुसंगत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments