Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनोज उर्फ सुभाष गावडे यांचे निधन

मनोज उर्फ सुभाष गावडे यांचे निधन

कळविण्यास अत्यंत दुःख होते की, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्राहक सेलचे शहर अध्यक्ष व चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मनोज उर्फ सुभाष परशुराम गावडे यांचे दिनांक रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी दुपारी 1 वाजता पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
चिंचवड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर, काळ भैरवनाथ मित्र मंडळ, धनेश्वर मित्र मंडळ यासारख्या मंडळांमध्ये ते सक्रिय होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले आहे.
त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मागे पत्नी निता सुभाष गावडे,विवाहित मुलगा प्रतिक सुभाष गावडे,सुन सौ.ऋतुजा प्रतिक गावडे,मुलगी प्रतीक्षा सुभाष गावडे व असंख्य मित्र असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता, पवना नदी घाट, मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगाव येथे होईल.
तरी महोदय या दुःखद घटनेची माहिती जनतेच्या माहितीसाठी आपल्या दैनिकात छायाचित्रासह प्रसिद्ध करावी ही विनंती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments