Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो फिनकॉर्प लिमिटेडने 3668.13 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

हिरो फिनकॉर्प लिमिटेडने 3668.13 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केले

हिरो फिनकॉर्प लिमिटेडने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेकटस दाखल केले आहे.

 

 

 

कंपनीने 36,681.34 मिलियन रुपयांपर्यंतच्या [₹ 3668.13 कोटी] आयपीओमार्फत प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांच्या ऑफरमार्फत फंड उभारणी करण्याचे ठरवले आहे. यामध्ये 21,000 मिलियन रुपयांपर्यंतच्या [₹ 2100 कोटी] नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि 15,681.34 मिलियन रुपयांपर्यंतच्या [₹ 1568.13 कोटी] समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा (समभागधारकांकडून) समावेश आहे.

 

 

 

हिरो फिनकॉर्प ही एक एनबीएफसी – नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे, जी प्रामुख्याने, भारतामधील वाढत असलेल्या रिटेल ग्राहक विभागाला आणि वेगाने औपचारिक होत चाललेल्या एमएसएमई ग्राहक विभागाला सेवा पुरवते. ही कंपनी रिटेल, एमएसएमई आणि सीआयएफ लोन पुरवते. त्यांच्या रिटेल लोनमध्ये वाहन, व्यक्तिगत आणि तारण कर्जांचा समावेश आहे. ही कंपनी “हिरो” या प्रसिद्ध आणि दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या ब्रँडअंतर्गत काम करते. दीर्घकाळापासूनचा कॉर्पोरेट वारसा, मजबूत ट्रॅक-रेकॉर्ड आणि हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या मालक व प्रमोटर कंपनीची प्रतिष्ठा हिरो फिनकॉर्पसाठी फायदेशीर ठरत आहे.

 

 

 

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून जी रक्कम उभी राहील तिचा वापर हिरो फिनकॉर्पने कंपनीचा व्यवसाय आणि संपत्तींमधील वाढीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या प्रथम श्रेणी भांडवल बेसमध्ये वाढ करण्यासाठी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी आखून दिलेल्या भांडवल पर्याप्ततेनुसार नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केला जाईल.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेकटसमार्फत प्रस्तुत केले जाणारे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

 

 

 

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स जेएम फायनान्शियल लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments