पुणे,5 ऑगस्ट 2024 : आघाडीच्या कृषी तंत्रज्ञान कंपनी असलेल्या सिंजेंटा ने पीक संरक्षणात क्रांती आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी दर्जेदार उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी मिराविस डुओ आणि रिफ्लेक्ट टॉप ही दोन नवीन उत्पादने सादर केली आहेत.
एडेपिडीन तंत्रज्ञानाचे बळ असलेल्या मिराविस डुओ हे टोमॅटो,मिरची,भुईमूग आणि द्राक्षासाठी वापरण्यास मंजूर केलेले अत्याधुनिक बुरशीनाशक आहे.हे पावडर मिल्ड्यू,ॲन्थ्रॅकनोज आणि लीफ स्पॉट यासारख्या रोगांवर अद्वितीय नियंत्रण प्रदान करते.या उत्पादनाची ताकद,तग धरण्याची क्षमता आणि व्यापक रोग नियंत्रण याद्वारे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे उत्पादन मिळवून देण्यास मिराविस डुओ मदत करते.
डबल बाईंडींग तंत्रज्ञान असलेल्या रिफ्लेक्ट टॉप हे भारतातील प्रमुख अन्न असलेल्या भातासाठी तयार केलेले बुरशीनाशक आहे.शीथ ब्लाईट पासून प्रभावी संरक्षण प्रदान करते,ज्यामुळे दीर्घकाळ रोग नियंत्रण सुनिश्चित होतो आणि मजबूत पीक पाया प्रदान करते.


