पुणे, ६ ऑगस्ट २०२४ : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) च्या सीएसआर शाखे तर्फे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील 100 सरकारी शाळांमध्ये वॉटर आरओ सिस्टीम बसवण्यात आली आहे. या आरओ सिस्टिमचे उद्घाटन एका विशेष कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये चांगले आरोग्य आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे, ज्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण होईल. या प्रकल्पाचा परिसरातील 35,000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.


