Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिसान मोटर इंडियाकडून भारतभरातील ग्राहकांसाठी मोफत मान्सून तपासणी शिबिराची घोषणा 

निसान मोटर इंडियाकडून भारतभरातील ग्राहकांसाठी मोफत मान्सून तपासणी शिबिराची घोषणा 

 

 

• १५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान देशभरातील सर्व निसान अधिकृत कार्यशाळांमध्ये नियोजित

• निसानच्या ३० पॉइंट चेकअपमध्ये मोफत बॅटरी चेकअप, एक्सटीरियर चेक, इंटेरिअर चेक, अंडरबॉडी चेक आणि रोड टेस्ट चा समावेश आहे

• व्हीएएस सेवांवर १०% विशेष ऑफर (अंडरबॉडी कोटिंग, उंदीर प्रतिकारक, एसी निर्जंतुकीकरण इ.) आणि ब्रेक पॅड रिप्लेसमेंटसह लेबरवर १०% पर्यंत विशेष ऑफर

• एक वर्षाच्या आरएसएसाठी विशेष योजनेची किंमत म्हणजे १०९९ रुपये केवळ शिबिर कालावधीत आणि कॉम्प्लिमेंटरी टॉप वॉशचा समावेश असेल

 

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी १५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत भारतातील सर्व अधिकृत निसान वर्कशॉपमध्ये मोफत मॉन्सून चेकअप कॅम्प ची घोषणा केली आहे. पावसाळ्यात वाहनधारकांना ३० कलमी तपासणी करून सुरक्षितपणे वाहन चालवता यावे, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोफत बॅटरी तपासणी, संपूर्ण बाह्य आणि अंतर्गत तपासणी, अंडरबॉडी तपासणी आणि रोड टेस्टचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांची वाहने सुस्थितीत ठेवण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी टॉप वॉश मिळेल.

 

या उपक्रमाचा एक भाग म्हणून निसान विशेष ऑफर्स देखील देत आहे: ब्रेक पॅड रिप्लेसमेंटसह लेबर चार्जेसवर १० % पर्यंत सूट आणि व्हीएएस सेवांवर १० % सूट- अंडरबॉडी कोटिंग, उंदीर प्रतिकारक, एसी निर्जंतुकीकरण इत्यादी. ग्राहक निसान वन अॅप किंवा निसान इंडिया वेबसाइटद्वारे सोयीस्कररित्या त्यांच्या सेवा अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

 

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, ‘पावसाळ्यात आमच्या ग्राहकांना सुरक्षित आणि त्रासमुक्त अनुभव मिळावा यासाठी आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो. उत्कृष्ट सेवा देण्याच्या आणि ग्राहक सेवेचे सर्वोच्च मानक राखण्याच्या आमच्या व्यापक वचनबद्धतेचा हा भाग आहे. ही सर्वंकष तपासणी आणि विशेष ऑफर देऊन आम्ही आमच्या ग्राहकांची मनःशांती वाढविण्याचे आणि पावसाळ्यातील आव्हाने सुरक्षितपणे हाताळण्यासाठी त्यांची वाहने इष्टतम स्थितीत आहेत याची खात्री करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

 

निसानच्या यापूर्वीच्या देशव्यापी मॉन्सून चेक-अप कॅम्पमध्ये उत्स्फूर्त सहभाग होता आणि भारतभरात १०,००० हून अधिक ग्राहक तपासणीसाठी आले होते. हा मजबूत प्रतिसाद उत्कृष्ट मालकी अनुभव प्रदान करण्यासाठी आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसानच्या समर्पणावर प्रकाश टाकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments