Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedअल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी;* *अल्पसंख्याक संस्था...

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी;* *अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार*

 

 

*अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठीच्या*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश*

 

*राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन*

*त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना वेग येणार*

*- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास*

 

*मार्टीसाठी ११ पदांसह ६.२५ कोटींच्या खर्चास मान्यता*

*उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती*

 

मुंबई, दि. ७ :- राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

 

राज्यातील मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. अल्पसंख्याक समुदायासाठी ‘टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली.

 

राज्यातील महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडण्याची तसेच त्यांच्यासाठी विकासयोजना तयार करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने पार पाडत आले आहेत. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी, यावर्षी, ११ मार्च रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णयही त्यांच्याच पुढाकाराने घेण्यात आला आहे.

 

अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण ११ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचे वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

——-०००००——

Previous article
Next article
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीमार्फत नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी*   पुणे, दि.७: महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार नवउद्योजकांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अशा व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन सक्षम करुन स्वावलंबनाला या प्रकल्पामार्फत चालना देण्यात येणार आहे. प्रकल्पाद्वारे व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून विपणन सहाय्य देण्यात येणार असून
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments