Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूटचे एका नव्या पर्वात पदार्पण- आता सौंदर्य आणि विज्ञानाचा अनोखा...

पॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूटचे एका नव्या पर्वात पदार्पण- आता सौंदर्य आणि विज्ञानाचा अनोखा संगम

 

महत्त्वाची वैशिष्ट्ये

• पॉन्ड्स कायम सौंदर्य क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीनुसार विकसित होत असतो आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो.

• या वैज्ञानिक आणि नावीन्यपूर्ण भूमिकेमुळे अनेक नवीन उत्पादनं विकसित करण्यास आणि सौंदर्याचे मापदंड उंचावण्यात पॉन्ड्स कायमच यशस्वी ठरला आहे.

• सेलेब्रिटी कियारा अडवाणी पुन्हा एकदा ग्राहकांबरोबरचे नाते आणखी दृढ करण्यासाठी पॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूट चा चेहरा म्हणून परतली आहे.

 

राष्ट्रीय ७ ऑगस्ट २०२४- सौंदर्य क्षेत्रातील अग्रणी पॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूट विज्ञान आणि तज्ज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेले नवे पर्व साजरे करण्यासाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात स्किनकेअर क्षेत्रात त्यांचा एक नवा आविष्कार सादर केला. पॉन्ड्सची १७५ वर्षांची परंपरा आहे. स्किनकेअर क्षेत्रात अनेक नवीन उत्पादनांची भर पडली असून सध्याच्या ग्राहकांच्या गरजेनुसार हायब्रिड फॉर्म्युलेशन्स सुद्धा तयार करण्यात आले आहेत.

सेलेब्रिटी ब्रँड अम्बेसेडर कियारा अडवाणी आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जुश्या भाटिया आणि या क्षेत्रातील अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पॉन्ड्सचे ग्लोबल ब्रँडचे उपाध्यक्ष जोपा मलांटिक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे स्किन केअर विभागाचे प्रमुख आणि उपाध्यक्ष प्रतीक वेद या कार्यक्रमाला उपस्थित होते. उजळ आणि आरोग्यदायी त्वचेसाठी ज्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत त्या आकर्षक पद्धतीने विविध कलाकृतींच्या माध्यमातून रचण्यात आल्या होत्या. वातावरणातील विविध गोष्टींमुळे त्वचेसाठी हानिकारक आणि दैनंदिन जीवनात त्वचेसाठी धोकादायक गोष्टींबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली. उत्तम उत्पादनांच्या माध्यमातून त्वचेची निगा राखण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमात हायड्रेशन साठी हायड्रा मिरॅकल, सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी सन प्रोटेक्शन आणि तरुण तजेलदार त्वचेसाठी युथ मिरॅकल यासारखी अनेक सौंदर्य उत्पादनं सुद्धा दाखवण्यात आली. एआय स्किन एक्सपर्टचा लाभही उपस्थितांना घेता आला. हा कंपनीचा अनोखा उपक्रम असून त्वचेचं परीक्षण करून त्यावरच्या उपाययोजना या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुचवण्यात येतात.

हा कार्यक्रम म्हणजे स्किनकेअर आणि विज्ञान यांचा अनोखा संगम होता. या कार्यक्रमात एक चर्चासत्र देखील झाले. सौंदर्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व शेरझेड श्रॉफ यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. गुटा-निआसिनॅमाइड या स्किनकेअर उत्पादनासाठी झालेलं संशोधन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गुटा-निआसिनॅमाइड मध्ये ग्लुटाथिओन प्रीकर्सर आणि निआसिनॅमाइड हे दोन अँटिऑक्सिंडंट्स आहेत. भारतात लवकरच लाँच होणारे आणि पेटंट घेतलेले दोन घटक यांचीही ओळख करून देण्यात आली. नितळ, कोणतेही डाग नसलेली आणि उजळ त्वचेसाठी या दोन घटकांचे आणि त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे महत्त्व यावेळी विषद करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी या ब्रँडबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल त्यांची मतं व्यक्त केली. पॉन्ड्स ग्लोबल ब्रँडचे उपाध्यक्ष जोपा मॅलंटिक म्हणाल्या, “पॉन्ड्स स्किनकेअर इन्स्टिट्यूट साठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या स्किनकेअर उत्पादनांमध्ये भारत आणि जगभरात नवनवीन गोष्टी आणत आहोत. ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि इच्छा समजून घेणे हा आमच्यासाठी सतत चालणारा बदलाचा प्रवास आहे. आमचा ब्रँड प्रत्येक पातळीवर कायमच आघाडीवर असतो. आमचे संशोधक विज्ञानाची ताकद आजमावून त्वचेची नैसर्गिक क्षमता, तसंच रिपेअर आणि रिस्टोअर या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देतात. आम्ही महिलांना त्यांचे आयुष्य आनंदाने जगण्यासाठी सक्षम करतो. जागरणं, मीटिंग्स, आणि उन्हाळा, शहरातली धावपळ या सगळ्या आव्हानांना पेलण्यासाठी साजेशी उत्पादनं तयार करण्यावर आमचा भर असतो.”

 

या लाँचवर प्रतिक्रिया देताना हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे उपाध्यक्ष प्रतीक वेद म्हणाले, “भारतातल्या ग्राहकांच्या गरजा बदलतात आहे. त्या पूर्ण करण्यासाठी पॉन्ड्स सुद्धा स्वत:ला बदलत आहे. आमचा ब्रँड हा भारतातील ग्राहकांचा आवडीचा ब्रँड असून तो कायम उत्तम रिझल्ट देण्यासाठी ओळखला जातो. आमची उत्पादनं अनेक वर्षं संशोधन केल्यानंतर तयार केली जातात. त्यांची चाचणी केली जाते आणि काही दिवसातच ते हवे ते रिझल्ट देतात. त्यामुळे त्वचेला पुन्हा एकदा झळाळी मिळते. आम्ही पॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूटच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी आणि हायब्रिड स्किनकेअर भारतात आणण्यासाठी उत्सुक आहोत.”

ब्रँड अम्बेसेडर कियारा अडवाणी म्हणाल्या, “सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्किनकेअर ही माझ्यासाठी अतिशय आनंद देणारी गोष्ट आहे. पॉन्ड्स स्किन इन्स्टिट्यूटचा चेहरा म्हणून परत येताना मला अतिशय आनंद होत आहे. या नव्या पर्वाचा भाग होता आल्याचा मला आनंद आहे. माझ्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना मला अतिशय आनंद होत आहे.”

हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. डॉ, शिवांगी राणा, डॉ.अनुप्रिया गोयल यांनी स्किनकेअर विषयी सजग असणाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच पर्सनलाइज्ड उत्पादनं निवडण्यात मदत केली. ही उत्पादनं आहे आघाडीच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या उत्पादनामुळे त्वचा आधीपेक्षा जास्त उजळून निघेल यात शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments