Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दलाल, नेत्यांकडून टँकरने वसुली.!*

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दलाल, नेत्यांकडून टँकरने वसुली.!*

 

 

 

*[ पुणे महापालिका हद्दीतील नागरिक पाण्या वाचून वंचित ठेवायचे नंतर टँकर माफियांकडून वंचितांची टँकरने पाणीपुरवठा करुन पुणे महापालिकेच्या तिजोरीची आर्थिक लूट करायची हे षडयंत्र शरीरात चालू आहे, एका बाजूला पाणीपुरवठा अपूर्ण करायचा तर दुसऱ्या बाजूने टॅंकरने पाणीपुरवठा करायचा त्यामुळे पुणे महापालिकेतील तिजोरीची आर्थिक लूट होत आहे…*

*विठ्ठल राजे पवार*

*अध्यक्ष शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य.]*

 

*पुणे, दिनांक ०८ ऑगस्ट२०२४*

मागील एक महिन्यांपासून धरणाच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रचंड पाऊस आहे , आणि पुढेही भरपूर प्रमाणात पडणार आहे असे वेधशाळेने सांगितलेले आहे, पाण्याचा शंभर टक्के साठा व पुरवठा शिल्लक असताना पुणे जिल्ह्यातील सर्व धरण तुडुंब भरल्याने 50 ते 55 हजार क्यूसेसने पुणे कार्यक्षेत्रातील सर्वच नद्यांमधून महापूर पाणी सोडण्यात आले होते, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील झिरो डेप्तला गेलेले उजनी धरण 125 टीएमसी ने ओहर फ्लो भरले गेले, एवढा प्रचंड पाऊस झाला की उजनी मधूनही देखील 5000 ने पाणी सोडावे लागले.! आणि सर्व ठिकाणी कृषी क्यानाँल, नाले, सिना भीमा बोगदा, वीज निर्मिती व सर्व शेती साठी कॅनलला उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे, एवढे प्रचंड मुबलक पाणी पुणे शहर आणि परिसरातील धरणांमध्ये असताना पुणे महापालिकेने नव्याने समाविष्ट केलेल्या सर्वच गावे परिसरातील नागरिकांना गेल्या चार-पाच वर्षांपासून पिण्याचे पाणी व इतर नागरिक सुविधा ही मिळत नाही, खऱ्या अर्थाने पुणे महापालिकेतील रहिवाशी, पुणे धरण साखळी मध्ये प्रचंड मुबलक पाणी असतानाही पुणे महानगरपालिका व नवीन गावातील कार्यक्षेत्रातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही! हे चाकरमाण्याचे पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील रहीवाशी नागरिकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

पुणे महानगरपालिकेतील जुन्या कार्यक्षेत्रात दोन किंवा तीन टाईम पाणी सुरू आहे मात्र नव्याने समावेश केलेल्या गाव आजही मुसळधार पावसातही ठाणे लिहिले आहेत याचा विचार पुणे महानगरपालिका प्रशासनाने करायला हवे पुणे महानगरपालिका प्रशासनाकर्त्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून किंवा नागरिक सुविधांपासून वंचित राहावे लागते याला अधिकाऱ्यांसोबतच राज्यकर्ते पुणे जिल्ह्याचे शहरातील आमदार खासदार मंत्री हे निवडणुकीच्या नादाला लागल्याने नागरिकांचे पाण्यापासून बेहाल होत आहे याला राज्यकर्त्यां आमदार खासदारां सह मंत्री, राज्यमंत्री देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे, यावेळी संघटनेचे मयुर गुजर, अनिल भांडवलकर, रवीराणा पवार, व परिसरातील नागरिक कार्यकर्ते यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर भोसले, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता जगताप साहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. यानंतर संघटनेच्या अध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्यकर्ते व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे ताषोरे ओढलेले आहेत. विठ्ठल राजे पवार म्हणाले की नवीन आणि जुन्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात टँकर माफीयाँ मार्फत पाण्याचा अर्थिक गैर व्यवहार केला जातो, नवीन गावांना पाणी देताना ते पाणी सातत्याने डिले केले जाते त्यामुळे नागरिकांना वेठीस धरून धरल्याने, नागरिक टँकरच्या पाण्याची मागणी करतात, टँकर माफिया आणि लोकप्रतिनिधी पुढारी आणि त्यांचे दलाला टँकरद्वारे पाणी विकून करून पाण्यापासून टँकरने पैसा कमावला जातो त्यामुळे पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील व नवीन समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येतो असा आरोप संघटनेने केलेला आहे, यामध्ये पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व लोकप्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचा आरोप ही संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे. त्यांनी महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री नंदकुमार जगताप यांना निवेदन दिल्याच्या नंतर महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर भोसले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांना निवेदन व प्रतिक्रिया व्हाट्सअप द्वारे पाठवले असल्याचेही राजे पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments