पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित १२ व्या ‘आर्किटेक्चरल कोशंट’ आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ईशा चिपळूणकर आणि शायना पाटील विजेते ठरले. तर पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे जयेश वर्मा मधुरा बांगल हे प्रथम उपविजेते ठरले. पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे श्रावणी सुकथनकर, दिव्या करपे यांनी द्वितीय उपविजेतेपद पटकाविले.
यावेळी आयआयए पुणे केंद्राचे अध्यक्ष विकास आचलकर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष ॲड.अभय छाजेड, विश्वस्त आणि सचिव जितेंद्र पितलीया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई उपस्थित होते. नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात स्पर्धा झाली.
ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे स्वराज जाधव, नितीश रंगास्वामी, बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे मृणाल चौधरी, चैतन्य कांबळे, बीएन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या नंदिनी लाहोटी समीक्षा भोयार यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. सर्वाधिक विद्यार्थी सहभागाबद्दल भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला विशेष पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत प्राथमिक फेरीत पुण्यातील ११ वेगवेगळ्या महाविद्यालयातील ५८ संघांनी भाग घेतला. यातून निवड झालेल्या सहा संघाची प्रसन्न देसाई यांनी अंतिम स्पर्धा घेतली.
विजेत्या संघाला प्रमाणपत्र आणि १२ हजार रुपये, प्रथम उपविजेत्या संघासाठी ८ हजार रुपये आणि द्वितीय उपविजेत्या संघांना ६ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. शेवटच्या तीन संघांसाठी २ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक तसेच प्रश्नमंजुषेत जास्तीत जास्त संघांचा सहभाग असलेल्या महाविद्यालयांसाठी ट्रॉफी देण्यात आली.
आरती चंद्रशेखर, देवेंद्र देशपांडे आणि श्रुती मुतालिक देसाई आणि हर्षवर्धन वाकोडे, रवी मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या टीमने स्पर्धेसाठी संशोधन केले. शेखर गरुड, प्रसन्न देसाई यांनी मार्गदर्शन केले.
—


