Mumbai, 12th August – नागीण रोगाबद्दल जागृती करण्यासाठी जीएसके ने एक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि मनोज पाहवा यांच्याबरोबर एक नवीन कॅम्पेन सुरू केलं आहे. कांजिण्या आणि नागीण यांच्यातील वैज्ञानिक संबंध या कॅम्पन मधून सांगितला जाणार आहे. डायबेटिस असणाऱ्या लोकांना या रोगाचा धोका किती आहे याबद्दलही जागृती केली जाणार आहे.
या कॅम्पेनवर प्रतिक्रिया देताना मनोज पाहवा म्हणाले, ‘मी अशा वयोगटात आहे ज्यात नागीण होण्याची शक्यता आहे. जीसकेच्या या उपक्रमातून मला या वेदनादायी रोगाबद्दल मला अधिक माहिती कळली आणि धोकादायक गोष्टी कोणत्या आहेत हेही कळलं. मला आरोग्याच्या अनेक समस्या आल्या आहेत. संसर्गजन्य आजार झाले की जगणं किती कठीण असतं याची मला कल्पना आहे. या उपक्रमाचा भाग आहे याचा मला खूप आनंद आहे. यामुळे लोकांना या आजाराबद्दल आणि तो कसा टाळावा याची माहिती मिळेल. मला वाटतं की ५० वर्षाच्या वर वय असलेल्या लोकांनी डॉक्टरांकडे जाऊन या आजाराची आणि तो कसा टाळावा याची माहिती घ्यावी.
जर एखाद्या व्यक्तीला कांजिण्या झाल्या असतील तर तो विषाणू मज्जा पेशीत राहतो. तो पुन्हा सक्रिय झाला तर नागीण होते. ज्या लोकांना कांजिण्या झाल्या आणि डायबेटिस असेल त्यांना नागीण होण्याचा धोका जास्त असतो. शुगर जास्त असेल तर प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कांजिण्यांचा विषाणू पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा धोका बळावतो.
जीएसकेच्या पेशंट एम्पॉवरमेंट हेड विग्येता अग्रवाल म्हणाल्या, “२०२३ मध्ये झालेल्या एपीआय- इप्सॉस सर्वेक्षणात ज्या लोकांना नागीण आहे त्यांनाही हा रोग झाल्याचं कळलं नाही. ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना या आजाराची आणि तो कसा टाळावा याची माहिती असायला हवी. आम्हाला नागीण होण्यामागचं शास्त्र आणि त्याचा कांजिण्यांशी असलेला संबंध याबद्दल अत्यंत साध्या पद्धतीने माहिती द्यायची होती. अमिताभ बच्चन यांच्याकडे सर्व प्रकारच्या लोकांबरोबर संवाद साधण्याची हातोटी आहे. या रोगाची लक्षणं ओळखणं आणि डॉक्टरकडे जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. अमिताभ बच्चन या कॅम्पेनचा चेहरा असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषत: वृद्धत्वाकडे झुकलेल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत होईल.
द स्मॉल बिग आयडिया नेटवर्क च्या ब्लिट्झक्रेग या विभागाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरिक्रिश्ननन पिल्लई म्हणाले, “या कॅम्पेनमध्ये दोन कॅम्पेन फिल्म आहेत. दोन शाळेच्या काळापासूनचे मित्र असतात. ते शाळेच्या दिवसांविषयी बोलत असतात आणि कांजिण्या आणि नागीण यांच्यातल्या संबंधांबद्दल बोलतात. तर दुसऱ्या फिल्ममध्ये डायबेटिस असलेले दोन मित्र आहेत. ज्यांना डायबेटिस असतो त्यांना हा रोग होण्याचा किती धोका असतो याबद्दल ते बोलत असतात. ‘ये तो सायन्स है’ या कॅम्पेनच्या माध्यमातून 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी त्यांच्या डॉक्टरशी नागीण या रोगाबद्दल आणि तो टाळण्याच्या उपाययोजनांबद्दल बोलावं असा उद्देश आहे. यातून मिळणारा संदेश अतिशय स्पष्ट आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे.”
दिग्दर्शक आर. बाल्की या फिल्मच्या क्रिएटिव्ह बाजूबद्दल बोलताना म्हणाले, “नागीण या रोगाबद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहेत. कांजिण्या आणि नागीण यांच्या परस्परसंबंधांबद्दल लोकांना सोप्या भाषेत सांगणं हे जिकिरीचं काम होतं. द स्माल बिग आयडियाने अतिशय साधा तरीही ठाम संदेश दिला आहे. यामध्ये सर्जनशीलतेपेक्षा ठामपणाला महत्त्व जास्त होतं.”
ही फिल्म युट्यूब (मोबाइल आणि कनेक्टेड टीव्ही) , गुगल डिस्पले, मेटा, निवडक ओटीटी प्लॅटफॉर्म्स, पेटीएम, गुगल पे, आणि वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सवर दाखवली जाणार आहे. जनरस एन्टरटेन्मेंट चॅनलबरोबरच हिंदी आणि प्रादेशिक भाषेतल्या बातम्यांमध्ये दाखवली जाणार आहे. त्याचबरोबर लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपती बरोबरही या कॅम्पेनसाठी विशेष भागीदारी करण्यात आली आहे


