Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून ३.३८ कोटी रूपये मूल्‍य असलेला स्‍कॉलरशिप प्रोग्राम लाँच

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनकडून ३.३८ कोटी रूपये मूल्‍य असलेला स्‍कॉलरशिप प्रोग्राम लाँच

गुरूग्राम । ऑगस्‍ट १६, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एच एम आय एफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्‍या (एच एम आय एल) परोपकारी शाखेने नागरी सेवा परीक्षा, कॉमन लॉ अॅडमिशन टेस्‍ट आणि आयआयटी विद्यार्थ्‍यांच्‍या प्रकल्‍पांसाठी तयारी करणाऱ्या भारतभरातील वंचित उमेदवारांना मदत करण्‍यासाठी ‘ह्युंदाई होप स्‍कॉलरशिप प्रोग्राम’ लाँच केला.

 

श्री. एच. डी. कुमारस्‍वामी, माननीय केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व पोलाद मंत्री, भारत सरकार यांच्‍या हस्‍ते या प्रोग्रामचे उद्घाटन करण्‍यात आले, यावेळी एच एम आय एल च्‍या कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन अँड सोशलचे व्‍हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद उपस्थित होते. या स्‍कॉलरशिप प्रोग्रामचा भाग म्‍हणून एच एम आय एफ ३.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक करेल, ज्‍यामुळे ३०० उमेदवार आणि १५० आय आय टी स्‍टुडण्‍ट टीम्‍सना फायदा होईल.

 

लाँच करण्‍यात आलेल्‍या प्रोग्रामबाबत मत व्‍यक्‍त करत एच एम आय एल च्‍या कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन अँड सोशलचे व्‍हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्‍हणाले, ”ह्युंदाईचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी संलग्‍न राहत आमचा सामायिक मूल्‍य निर्माण करण्‍यावर आणि समाजात सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍याला चालना देण्‍यावर विश्‍वास आहे. महत्त्वाकांक्षी टॅलेंटना त्‍यांच्‍या ध्‍येयांवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत करण्‍यासाठी सामाजिक, भावनिक व आर्थिक साह्य देत भावी लीडर्स आणि चेंजमेकर्स घडवण्‍याकरिता ह्युंदाई होप स्‍कॉलरशिप प्रोग्रामची संकल्‍पना मांडण्‍यात आली. ह्युंदाई होप स्‍कॉलरशिप प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून आमचा क्षेत्रात प्रगती करण्‍याचा आणि भारतातील भावी लीडर्सना सक्षम करण्‍याचा, तसेच देशाच्‍या सामाजिक व आर्थिक विकासाला पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे. हा प्रोग्राम आर्थिक साह्य, सर्वसमावेशक संसाधने, मार्गदर्शन व सपोर्ट सिस्‍टम्‍स देईल, ज्‍यामुळे तरूण टॅलेंटना त्‍यांच्‍या शैक्षणिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करून निवडलेल्‍या क्षेत्रांमध्‍ये प्रगती करता येईल.”

 

या प्रोग्रामच्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्‍त करत श्री. एच. डी. कुमारस्‍वामी, माननीय केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व पोलाद मंत्री, भारत सरकार म्‍हणाले, ”ह्युंदाई होप स्‍कॉलरशिप प्रोग्राम ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनचा अद्वितीय उपक्रम आहे आणि आम्‍ही समाजातील आर्थिकदृष्‍ट्या कमकुवत विभागातील परिवर्तन पाहण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना साह्य देण्‍याच्‍या विचारशील दृष्टिकोनाचे कौतुक करतो. विशेषत: नागरी सेवा, कायदा व तंत्रज्ञान यांसारख्‍या प्रमुख क्षेत्रांमध्‍ये अनेक पात्र उमेदवारांसाठी आर्थिक अडचणी मोठा अडथळा बनला आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम दीर्घकाळापर्यंत देशाच्‍या भल्‍यासाठी प्रयत्‍न करेल आणि त्‍यामधून ह्युंदाई मोटर इंडियाची राष्‍ट्रनिर्मितीप्रती कटिबद्धता दिसून येते.”

 

 

एच एम आय एफ च्‍या वतीने भारतकेअर्सकडून ह्युंदाई होप स्‍कॉलरशिप प्रोग्रामची अंमलबजावणी करण्‍यात येईल. या प्रकल्‍पाचा विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना सत्‍यात अवतरण्‍यासाठी, त्‍यांच्‍या स्‍वत:करिता व देशाकरिता उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवण्‍यासाठी सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. टॅलेंटना निपुण करत आणि सर्वोत्तमतेला चालना देत हा प्रोग्राम व्‍यापक प्रभाव निर्माण करतो, ज्‍याचा विद्यार्थ्‍यांसोबत मोठ्या प्रमाणात मानवतेवर देखील परिणाम

होईल.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments