Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorized*चि. सुदर्शन दीपक चव्हाण यांचा 15 ऑगस्ट रोजी झाला विशेष सन्मान*

*चि. सुदर्शन दीपक चव्हाण यांचा 15 ऑगस्ट रोजी झाला विशेष सन्मान*

 

 

*ठाणे, दि.18(जिमाका):-* येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री. दिपक चव्हाण यांचे सुपुत्र व श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी चि. सुदर्शन दिपक चव्हाण हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.

या मान्यवरांनी चि. सुदर्शन ला उज्वल भविष्यासाठी अनेकोत्तम आशिर्वाद देवून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments