पुणे, १८ अगस्त ः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन हबने २० ते २४ ऑगस्ट दरम्यान कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभामंडपात पाच दिवसीय राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२४ ची तिसरी आवृत्ती जाहीर केली आहे.
याचे उद्घाटन २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. उद्योजक, लेखक, मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट आणि बिझनेस कन्सल्टंट प्रकाश बंग यांच्या हस्ते होणार आहे. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. समारोप समारंभ होणार आहे. यावेळी हनी बी नेटवर्कचे संस्थापक, पद्मश्री अनिल गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच फिक्की एफएलओ पुणेे चॅप्टरच्या अध्यक्षा पिंकी राजपाल आणि लेखिका राज्यलक्ष्मी राव विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रो.डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीचे डीन प्रा.डॉ. नीरज महिंद्रू यांनी दिली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालविला जाणारा आहे. जे सामान्य संधीच्या पलीकडे क्षितिजांचा विस्तार करण्यावर आणि विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेकडे मार्ग मोकळे करण्यावार विश्वास ठेवणार्यांवर आहे. राइड २०२४ची थीम संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उदयोजकता आणि त्यानंतर स्टार्टअप एक्सीलरेटर आणि इनोव्हेशन हब या अनेक स्तंभांमध्ये पसरलेली आहे. पाच दिवस चालणार्या या परिषदेला हजारो विद्यार्थी येण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये शंभराहून अधिक स्टार्टअप्स आणि स्पीकर्स आणि उद्यम भांडवल उदयोगातील पन्नासहून अधिक तज्ञांचा समावेश असेल.
प्रत्येक दिवसात विषय तज्ञांचा समावेश असेल जे वरील विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित करतील. त्यांना एक अद्वितीय दृष्टीकोन देईल आणि वास्तविक जगाच्या वातावरणाचा अनुकरण करून चौकटीबाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करतील. हा कार्यक्रम तंत्रज्ञान, डिझाइन, आरोग्यसेवा, कृषी, तंत्रज्ञान, शाश्वत ऊर्जा आणि रिटेल यासारख्या क्षेत्रातील स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करेल.
राइड चा मुख्य उद्देश्य एमआयटी डब्ल्यूपीयू मध्ये स्टार्टअप्सची एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना विचारमंथन ते बाजारपेठेपर्यंत व्यवसाय चालवण्याची संपूर्ण माहिती देणे हे आहे.
याआधी राईडच्या मंचावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.माशेलर, नमिता थापर, प्रभादीप सिंग यासारख्या वक्त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून उद्योजकता अंगीकारण्याची प्रेरणा दिली.


