Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedभीती हेच आजाराचे मुख्य कारण ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि लेखक डाॅ....

भीती हेच आजाराचे मुख्य कारण ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि लेखक डाॅ. दिगंबर नाईक यांचे मत

श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर : ‘हिल युवर सेल्फ’ या आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

 

पुणे : मनावर नियंत्रण असले तर तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज पडणार नाही. मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्यानेच आपल्याला औषधांची आणि डॉक्टरांची गरज पडते. दृढ विश्वासाने दुर्धर आजारांवर देखील मात करता येते. आरोग्य ही संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे. भीती हे आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे भीतीला तुमच्या मनातून काढून टाका. असे मत ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि लेखक डाॅ. दिगंबर नाईक यांनी व्यक्त केले.

 

श्री शिवाजी मराठा सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘हिल युवर सेल्फ’ या आरोग्य जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अरण्येश्वर कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे वास्तुविशारद मोहन निकम, वृंदावन शिक्षण संस्था गोवाच्या संचालिका मंगला नाईक, सातारा नगरपरिषदेचे सहाय्यक नगर रचनाकार प्रमोद ढाणके, श्री शिवाजी मराठा सोसायटी चे खजिनदार जगदीश जेधे, ॲड. एन.डी. पाटील संस्थेचे सभासद, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले, श्री शिवाजी मराठा सोसायटी चे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. बजरंग सुतार आणि अखिल भारतीय परिषदेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कोळी यावेळी उपस्थित होते.

 

डाॅ. दिगंबर नाईक म्हणाले, आपल्या सगळ्यांच्याच सोबत एक उर्जेचे वलय असते. त्या वलयाची जाणीव आपल्याला नसते. आपल्या उर्जेचा अनुभव करा आणि विश्वास ठेवा की जे तुम्हाला मिळवायचे आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. योग्य व्यायाम, योग्य आहार आणि सक्षम नियंत्रित मन ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments