Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात आपले सरकार ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल २.० च्या प्रशिक्षणाचे आयोजन*

जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सरकार ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल २.० च्या प्रशिक्षणाचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २१: सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल २.०’ च्या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि. २०) रोजी आयोजन करण्यात आले.

 

या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस आयुक्त कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, नगर प्रशासनातील सर्व मुख्याधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील ई-गव्हर्नन्स तज्ज्ञ उपस्थित होते.

 

या प्रशिक्षणात आपले सरकार ग्रीव्हन्स पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण कसे करावे, या पोर्टलच्या तांत्रिक बाबी कशा प्रकारे हाताळाव्यात, तसेच या पोर्टलमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक असेल तर त्याबाबतचा फीडबॅक कसा द्यावा आदी बाबींवर ई-गव्हर्नन्स तज्ज्ञांच्या पथकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments