फ्लिपकार्ट ग्रुपचा आधार असलेले सुपर.मनीने बीटा आवृत्तीच्या यशस्वी चाचणीनंतर बीटा व्हर्जनचा टप्पा अधिकृतरीत्या पार केला आहे.
सुरुवातीच्या ऑफरिंगमध्ये RuPay क्रेडिट कार्ड आणि बँक खाते लिंक करून यूपीआयचा वापर करता येणार आहे.
येत्या काही महिन्यात प्रथमच यूपीआयवर क्रेडिटची सुविधा मिळणार
बंगळुरू, ऑगस्ट , २०२४- सुपर.मनी या क्रेडिट फर्स्ट यूपीआय प्लॅटफॉर्मने यशस्वी बीटा फेझनंतर आज अधिकृतरीत्या त्यांच्या अपचं अनावरण केलं. बीटा फेझमध्ये जवळजवळ दहा लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केलं आणि जवळजवळ एक कोटी व्यवहार झाले. त्यामुळे या ॲपला मिळणारा प्रतिसाद लक्षात येईल. सुपर मनीने क्रेडिट ऑन यूपीआय प्रणालीची चाचणी केली. त्यासाठी प्रतीक्षा यादीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. RuPay क्रेडिट कार्ड हे सुपर.मनीचं पहिलं सोल्यूशन असून ते यूपीआय रेल्स वर व्याज असलेल्या वॉलेटसारखं काम करते. जगात पहिल्यांदाच ही सुविधा मिळत आहे.
दैनंदिन व्यवहारात रिवॉर्ड्स आणि क्रेडिट एक्सपिरियन्स मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यूपीआय ऑफरिंग लाँच केले आहेत. प्रत्येक मर्चंट ट्रान्झॅक्शनवर पाच टक्के कॅशबॅक आणि फ्लिपकार्ट आणि मिंत्रा सारख्या पार्टनर मर्चंटकडून स्पेशल ऑफर्स मिळतील.
सुपर.मनी आपल्या नावीन्यपूर्ण रिवॉर्ड प्रोग्राम्ससह पेमेंट्सचा एक सामाजिक आणि आनंददायी अनुभवात रूपांतरित करत आहे. त्यात सुपरनेमड्रॉप, रॅफल, आणि मीम-मनी यांचा समावेश आहे. सुपरनेमड्रॉपचा वापर करून युजर्स त्या आठवड्यात फीचर झालेल्या व्यक्तीला पैसे पाठवून त्वरित कॅशबॅक मिळवू शकतात. लवकरच सुरू होणाऱ्या रॅफल युजर्सला आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल, तर मीम-मनी आर्थिक व्यवहारांमध्ये सामाजिक घटक जोडण्याचे काम करेल, ज्यामुळे ते अधिक मनोरंजक आणि फायदेशीर होईल.
भारताच्या वाढत्या ग्राहक क्रेडिटच्या संधीचा फायदा घेण्यासाठी, सुपर.मनीने आपल्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी NPCI च्या RuPay च्या सुविधांबरोबर एकत्रीकरण केलं आहे. सुरुवातीपासूनच, यूपीआय QR कोड्सने POS सिस्टीम्सला वेगाने मागे टाकलं आहे आणि नवीन पेमेंट आणि क्रेडिट वापराचे प्रकार खुले झाले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या काही अहवालानुसार, व्यापाऱ्यांसाठी कमी-मूल्याच्या व्यवहारांवर क्रेडिट स्वीकारण्याचा खर्च शून्य झाला आहे . जगभरात पहिल्यांदाच असं घडलं आहे त्यामुळे भारतात UPIचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे. यूपीआय वरील क्रेडिट कर्जदारांच्या प्रोफाइलमध्ये लक्षणीय बदल करेल आणि त्याबरोबरच देशातील किरकोळ क्रेडिटचा स्वीकार वाढेल. यामुळे टियर 2 आणि टियर 3 भारतातील वापरकर्त्यांना औपचारिक क्रेडिटच्या क्षेत्रात आणण्याचीही शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांत, सुपर.मनी आघाडीच्या वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करून विविध वित्तीय उत्पादने सादर करण्याची योजना आखत आहे. त्यात को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, फिक्स डिपॉझिट आणि त्वरित प्री अप्रुव्ह्ड पर्सनल लोनचा समावेश असेल, त्यामुळे भारतीय ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजांची पूर्तता होईल. यूपीआय इन्फ्रास्ट्रक्चरचा लाभ घेऊन वित्तीय सेवांचं लोकशाहीकरण करणं हा सुपर.मनीचा उद्देश आहे. ते सरकारच्या व्यापक आर्थिक सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहे.
सुपर.मनीचे संस्थापक आणि सीईओ प्रकाश सिकरिया म्हणाले, “सुपर.मनीच्या अॅपच्या लाँचिंगची वेळ अत्यंत योग्य आहे, कारण यूपीआय ने सलग तिसऱ्या महिन्यात 20 लाख कोटींच्या व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे. आमच्या बीटा फेजने सुपर.मनी च्या अनुभवाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, विशेषतः यूपीआय वरील क्रेडिटमध्ये आम्ही ज्या नवीन कल्पना आणत आहोत. . भारतातील डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. परंतु खरी क्षमता यूपीआय रेल्सवर वित्तीय सेवा सुलभ पद्धतीने एकत्रित करण्यात आहे. आम्ही क्रेडिट उत्पादनांमध्ये नवीन कल्पना आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाखो भारतीय क्रेडिट इन्फ्रास्ट्रक्चरशी जोडले जातील. सुपर.मनीमध्ये, आम्ही पेमेंट प्लॅटफॉर्मपेक्षाही खूप पुढचा विचार करतो आहोत. युजर्स वित्तीय सेवांशी ज्या पद्धतीने जोडले जातात त्या पद्धतीची पुनर्रचना करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ते अधिक सुलभ, फायदेशीर आणि सरकारच्या डिजिटली सक्षम भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल.”
सध्या, सुपर.मनीने वित्तीय सेवांना सक्षम करण्यासाठी अनेक वित्तीय संस्थांसोबत भागीदारी केली आहे. सुपर.मनी अॅप सध्या सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच iOS प्लॅटफॉर्मवरही लाँच होणार आहे.
NPCI च्या मते, भारताच्या प्रमुख पेमेंट्स प्लॅटफॉर्म युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर क्रेडिट व्यवहार प्रत्येक महिन्यात 10,000 कोटींवर पोहोचत आहेत. त्यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी ग्राहकांना क्रेडिट अधिक सोयीस्कर करण्याची
संधी मिळते


